वाघ, बिबट्यासह अन्न वन्य प्राण्यांचे र्तुष्षा तृप्तीसाठी भटकंती, व्याघ्र प्रकल्पातील पाण्या त मोठ्याकडे मात्र दुर्लक्ष.

 वाघ, बिबट्यासह अन्न वन्य प्राण्यांचे र्तुष्षा तृप्तीसाठी भटकंती, व्याघ्र प्रकल्पातील पाण्या त मोठ्याकडे मात्र दुर्लक्ष.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पी एन देशमुख

----------------------------------

अमरावती (मेळघाट)

विदर्भात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचे चटके तापदायक ठरू लागले आहेत. दुसरीकडे व्याघ्रा प्रकल्प अथवा जंगलात वाघ, बिबट्यासह अन्न वन्य प्राण्यांना तृष्णातुष्टीसाठी भटकंती करावी लागत आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्रा प्राधिकरणाने महिन्यातच यंदा जानेवारी वन्य प्राण्यांचा र्तुष्ण तृप्तीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत निर्देश दिले होते. विशेषतः विदर्भात पारा सर्वाधिक राहत असल्याने व्याघ्रा प्रकल्पात वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती होऊ यासाठी पाणवट्याच्या काळजी घेण्याचे सूचना दिले आहेत. दरम्यान, विदर्भातील एप्रिल महिन्यात झालेल्या पावसाने नैसर्गिक आणि कृत्रिम पान वठ्यामध्ये मुबलक पाणी होते. तथापि, मे महिना सुरू होताच व्याघ्र प्रकल्पासह प्रादेशिक विभागाच्या जंगल क्षेत्रातील पानवट्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची विश्वासनीय माहिती आहे. एकीकडे सूर्य आग ओळखू लागला असताना, जंगल क्षेत्रातील ओढे, नाले, पान गोठ्यामध्ये पाणी नसेल, तर वन्य प्राण्यांचे पाण्यासाठी काय हाल होत असतील, याचा वन अधिकाऱ्यांनी विचार करणे काळाची गरज झाली आहे. विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात पाणवट्या संदर्भात राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनरक्षक माहित गुप्ता यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता मी मीटिंगमध्ये आहे नंतर बोलतो असे म्हणत उत्तर देणे टाळले हे विशेष. व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक कृत्रिम पानवट्यात पाणी समस्या उद्भवल्या प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांचे आहेत. मात्र,व्याघ्र प्रकल्प व जंगल क्षेत्रातील पान ओठ्यावर वन्य प्राण्यांचे तृष्ट तृप्ती भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो का याची तपासणी केल्यास बरेच गबाळ बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लीटमस पेपर नाही. पानवट्यात विष प्रयोगाच्या तपासणीसाठी वन कर्मचाऱ्यांना लिट मत पेपरचा वापर आणिवर्य करण्यात आला आहे. मात्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पावर अंतर्गत सीपना, अकोट, गुगामल, मेळघाट या चार वन्य जीव विभागातील वन् कर्मचाऱ्या ंना पानवट्याच्या तपासणीसाठी लीटमस पेपर मिळत नसले की माहिती आहे. त्यामुळे पान ओठ्यावर तस्करांनी विविध प्रयोग केल्यास वाघाच्या हत्तीची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. वन्यजीव विभागातील कर्मचारी हतबल झाले असून लिट मस पेपर नाही. पोशाख आणि संरक्षणासाठी शस्त्र नाही. अशी माहिती समजली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.