Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. आंबेडकर चौक ते लोणी फाटा सिमेंट रोड झाला पण अतिक्रमणाच काय?

 डॉ. आंबेडकर चौक ते लोणी फाटा सिमेंट रोड झाला पण अतिक्रमणाच काय?

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकूर

-------------------------------

रिसोड शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीकडून मागील वीस वर्षात व्हायला पाहिजे तेव्हढे प्रयत्न झाले नाही त्यामुळे रिसोड शहर विकासाच्या बाबतीत खूप मागे पडले आहे.शहरात अनेक समस्या आहेत खासकरून पार्किंग समस्या, वाहतूक समस्या, अतिक्रमण समस्या इत्यादी.नगर परिषद ने मुख्य रस्त्यावर दुकाने बांधली त्याचा आर्थिक लाभ ही घेतला मात्र पार्किंग सारखी सुविधा करायला विसरले कदाचित तेवढी लाख मोलाची जागा सोडावी वाटली नसेल किंवा प्लॅन देणारा इंजिनियर कडे तशी बुद्धिमत्ता नसेल किंवा रिसोड च्या लोकांना काही गरज नाही असा समज झाला असावा.नगर परिषदेची कामे बहुतेक नागरिकांच्या हितापेक्षा लोकांनी निवडून दिलेल्या सेवकांच्या आणि त्या सेवकांच्या ताटाखालचे मांजर झालेल्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी केले जातात.आजपर्यंत असेच अनुभव रिसोडकरांना आले परंतु आता राजकारण आणि समाजकारण बदललं आतातरी शहराच्या विकासाच्या संबंधीत असणारी व्यवस्था बदलायला पाहिजे ही सर्वसामान्य रिसोडकरांची अपेक्षा आहे. सध्या नगर परिषदला मुख्याधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहत असल्याने त्यांच्याकडे अधीकचे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर आपण जनहितार्थ करावा ही साधी अपेक्षा नागरिकांना आहे ते आपण कराल हा थोडाफार विश्वास मुख्यधिकारी सतीश शेवदा यांच्याप्रति आहे. मागील अनेक वर्षांपासून होऊ घातलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा हा रस्ता मागील काही महिन्यापासून सुरु झाला.या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल आणि विलंबबद्दल सातत्याने ठेकेदार आणि प्रशासन चर्चेत राहले परंतु आम्ही करू तेच योग्य याप्रमाणे ठेकेदाराने आपल्या मर्जीने कामं सुरु ठवले आणि आता ते पूर्णत्वाकडे जात आहे.रस्त्याचे कामं सुरु होण्यापूर्वी, सुरु असताना आणि आता पूर्ण होतं असताना तेथील छोटे व्य्यवसाय करणाऱ्यांनी अतिक्रमण करणे मधोमध हातगाड्या लावणे हे कधीच बंद केले नाही.जसजसा रस्ता होत राहला तसतशी या अतिक्रमण धारकाची अतिक्रमण करण्याची हिम्मतही वाढत राहली. अनेकानी आपली दुकानाची पाले रस्त्यावर नीट बांधता यावी म्हणून या सिमेंट रोडवर कामं चालू असताना लोखंडी कड्या फसवून ठेवल्या आहेत यावरून हा रस्ता राहादारी साठी न होता केवळ आपली दुकानं थाटण्यासाठी आणि अतिक्रमण करण्यासाठीच होतं असल्याची मानसिकता नगर परिषद च्या दुर्लक्षामुळे झाली आहे. नगर परिषद व तत्सम जबाबदार अधिकाऱ्याने लक्ष देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणीफाटा या रस्त्यावर होतं असलेल्या अतिक्रमण चा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा रिसोडकरांच्या अक्रोशाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. रिसोड शहरच्या विकासासाठी काही कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज बनली आहे.अन्यथा भविष्यात मोठया समस्यांचे आगार झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments