Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी,रिसोड चे ठाणेदार भूषण गावंडे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा स्वाभिमानीचा आरोप.

 रिसोड तालुक्यातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यास पोलीस प्रशासन अपयशी,रिसोड चे ठाणेदार भूषण गावंडे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा स्वाभिमानीचा आरोप.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर.

-----------------------------

तालुक्यात चोरांनी हैदोस घातला असून त्यांना पायबंद घालण्यास रिसोड पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून शेतकऱ्यांच्या शेतातील शेती साहित्याची चोरी होत असल्याचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने चोरांना पोलीस प्रशासनाचे अभय तर नसेल ना? असा संशय व्यक्त केल्या जात आहे.रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर, पाचंबा, घोटा शेतशिवारात कृषी साहित्य चोरून नेल्याच्या अनेक घटना घडल्या असून या भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून तक्रारी घेण्यास नकार देत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन रिसोड परिसरातील शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाचंबा, एकलासपूर शेतशिवारातून गत काही दिवसांपूर्वी स्प्रिंकल तोट्या, पाईप, केबल व इतर कृषी साहित्य चोरीस गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.यामध्ये एकलासपूर येथील ९, पाचंबा येथील ४ शेतकऱ्यांच्या शेतातून स्प्रिंकलर तोट्या व इतर साहित्य तर घोटा (ता. रिसोड) शेत शिवारातील ४ शेतकऱ्यांच्या शेतातून सोलर पॅनलला बसविलेले केबल व इतर महागडे कृषी साहित्य चोरीस गेले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा पोलीस अदीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांना शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या कृषी साहित्याच्या तक्रारी नोंदवून घ्याव्या व् तातडीने तपास करून शेतकऱ्यांचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शेतकरी हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील इढोळे, विदर्भ सचिव राम पाटील इढोळे यांनी दिला आहे. 

....

*रिसोड पोलीसांच्या कार्यवाहीबाबत शंका?*

गेल्या काही दिवसांत रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून,या चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यास गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घेण्यात येत नाही. त्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनच्या कार्यवाहीबाबत संशय व्यक्त केल्या जात असून चोरट्यांना रिसोड पोलीस प्रशासनाचे अभय तर नाही ना असा संशय शेतकऱ्यांमधून उपस्थित केल्या जात आहे.

Post a Comment

0 Comments