Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पन्हाळा तालुक्यातील आळवे ते देवठाणे दरम्यानच्या बंधार्‍याची उंची वाढवून नवीन रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्याची गरज.

 पन्हाळा तालुक्यातील आळवे ते देवठाणे दरम्यानच्या बंधार्‍याची उंची वाढवून नवीन रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्याची गरज.

---------------------------------

  पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील           

---------------------------------

पन्हाळा तालुक्यातील आळवे ते देवठाणे दरम्यान असलेल्या कासारी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा कमकुवत झाला असून संरक्षण कठडे देखील तुटले आहेत.तरी देखील धोका पत्करून या बंधार्‍यावरून धोकादायक वाहतुक सुरू आहे.बंधार्‍याची उंची वाढवून आळवे गावाला जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्याची नागरीकांच्यातून मागणी होत आहे.


      कासारी नदीवर आळवे आणि देवठाणे गावाला जोडणारा अनेक वर्षापूर्वीचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे.बंधार्‍याची उंची कमी असल्याने या बंधार्‍यावर पावसाळ्यात हमखास पाणी येत असल्याने दरम्यानच्या काळात वाहतुक पूर्णपणे बंद होते.बंधार्‍याचे संरक्षण कठडे तुटल्याने धोका पत्करून या बंधार्‍यावरून वाहतुक सुरू आहे.

            दरम्यान दोन्ही गावाला जोडणारा साखळी पाणंद रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.सध्या रस्त्याच्या दुतर्फा झोडपे वाढली आहेत.लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर खडीकरण आणि डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध झाल्यास पावसाळ्यात देखील या मार्गावरून वाहतुक सुरू राहणार आहे.वेळोवेळी नागरीकांची याविषयी मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात आलयं.या मार्गाचे डांबरीकरण झाल्यास आणि पुलाचे नवीन बांधकाम झाल्यास शेकडो शेतकर्‍यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असून या मार्गावरून पावसाळ्यात बंद होणारी वाहतुक देखील कायमची सुरू राहणार असल्याने आळवे ते देवठाणे तीन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी निधीची उपलब्धता करूण देण्याची मागणी परिसरातील नागरीकांच्यातून होतेयं.

Post a Comment

0 Comments