मुरगूड व परिसरात हळहळ.लोकरेंच्या पत्नी व मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले.

 मुरगूड व परिसरात हळहळ.लोकरेंच्या पत्नी व मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड प्रतिनिधी

जोतिराम कुंभार

---------------------------

आमच्या घरातला कर्ता पुरुषच गेला, आता आम्हाला आधार कुणाचा? असे म्हणत काल शुक्रवारी वेदगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या जितेंद्र लोकरे यांच्या पत्नी साधना व आई लक्ष्मी यांनी फोडलेल्या टाहोमुळे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.मयत जितेंद्र  यांच्या पत्नी व मातोश्री पूर्णपणे खचून गेल्या आहेत. हे गर्भगळीत कुटुंबीय पाहून घाटगे  यांनाही गलबलून आले.


  कालच्या घटनेतून अजूनही लोकरे कुटुंबीय सावरलेले नाही.या कुटुंबीयांसह संपूर्ण मुरगूड शहरावर शोककळा पसरली आहे.श्री घाटगे सांत्वनासाठी लोकरे यांच्या घरी जाताच त्यांचे बंधू मारुती यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मयत लोकरे यांची कन्या आरोही व मुलगा आर्यन यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.भेदरलेल्या या चिमुकल्यांना घरातील मोठी मंडळी सावरण्याचा प्रयत्न करत होती. श्री घाटगे यांनीही त्यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवून आधार दिला.

   यावेळी दगडू शेणवी, अनिल अर्जुने, विजय राजीगरे, संतोष गुजर,राजेंद्र चव्हाण,जयवंत पाटील आदी उपस्थित होते.


छायाचित्र :मुरगुड येथे लोकरे कुटूंबियाच्या सांत्वनपर भेटीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष  समरजितसिह घाटगे

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.