ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी 'शाहू'च्या योजनांचा लाभ घ्या सुहासिनीदेवी घाटगे.

 ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी 'शाहू'च्या योजनांचा लाभ घ्या सुहासिनीदेवी घाटगे.

--------------------------------

मुरगुड,प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

--------------------------------

  शाहूसाखर कारखान्यामार्फत सुरु असलेल्या विविध ऊस विकास योजनांचा लाभ ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी घ्या.असे आवाहन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राज्य साखर संघाच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

 मुरगुड (ता.कागल)येथे शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित ऊस पीक चर्चासत्र कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. पुढे म्हणाल्या,ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवल्याशिवाय ऊस शेती किफायतशीर होणार नाही. त्यासाठी शाहू साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे.नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.


 व्हीएसआयच्या शास्त्रज्ञ डॉ.प्रीती देशमुख म्हणाल्या,जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारल्याशिवाय ऊसाचे अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. त्यासाठी हिरवळीच्या खतांचा बेवड,शेणखत,कंपोस्ट खत व शाहू समृद्ध सेंद्रिय खतांचा नियमितपणे वापर करणे गरजेचे आहे.रासायनिक खते एकाचवेळी भरमसाठ न देता तज्ञांच्या शिफारशीनुसार विभागून मातीआड करुन द्यावीत.


  कीटक शास्त्रज्ञ डॉ गणेश कोटीगरे म्हणाले, ऊस पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या रोग व किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.


   स्वागत शेती अधिकारी रमेश गंगाई यांनी केले.आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.