Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न व पारंपारिक पध्दतीत शिवजन्मोत्सव साजरा.

 श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न व पारंपारिक पध्दतीत शिवजन्मोत्सव साजरा.

------------------------------

भणंग प्रतिनिधी 

चंद्रशेखर जाधव 

------------------------------

श्री क्षेत्र मामुर्डी येथे २ मे ते ९ मे रोजी अखंड हरीनाम सप्ताह सुरू होता हभप अतुल महाराज यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली सकाळी काकडा , ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन , प्रवचन, किर्तन, भजन जागर असे कार्यक्रम सुरळीत पार पडले . सदर सप्ताहमध्ये सर्व हभप संतोष महाराज दळवटे, संतोष महाराज महामुलकर , विठ्ठल महाराज सकुंडे, हणमंत महाराज पार्ट , बापू महाराज महांगरे , सुभाष महाराज मिस्त्री गोगवे , इथापे महाराज , यांची प्रवचने झाली 

          अखंड हरीनाम सप्ताह मध्ये सर्व हभप यशवंत महाराज वाटेगावकर, शिवाजी महाराज आग्रे, रोहीत महाराज शिंदे - सरकार , अविनाश महाराज महाडिक जावळीकर , विशाल महाराज थोपटे पिंपरे खुर्द पुरंदर , प्रविण महाराज शेलार ( श्री विठ्ठलधाम आंबेघर ) , संगित विशारद सुप्रीयाताई खडांगळे , आणि काल्याचे किर्तन हभप अतुल महाराज देशमुख गांजे यांनी हरी किर्तन सेवा केली सदर सप्ताहमधे भजन मंडळ गवडी , वागदरे, गोंदेमाळ , तांबी तर्फे मेढा , अचानक भजन मंडळ मेढा यांचा सुस्वर भजनाचा जागराचा कार्यक्रम झाला

महीलांसाठी व पुरुषांसाठी विवीध कला गुणात्मक कार्यक्रम ठेवण्यात आले

सदर कायक्रमात लकी ड्रॉ . मधील विजेते महिलांना पैठणी साडी व पुरुषांना उपरणे टोपी देणेत आली विजेते सिताबाई नारायण सुळ , आनंदशेठ बापु धनावडे ,वैशाली सुभाष धनावडे , कु.अनिकेत धोंडीबा मोरे , कु.अक्षता नामदेव धनावडे ,सोपान आनंदा धनावडे ,हिराबाई किसन धनावडे ,नामदेव रावजी धनावडे ,आरती सचिन बिरामणे ,बाजीराव नवलु पार्टे गोंदेमाळ ,विमल किसन धनावडे , किसन जुनघरे चोपदार ,कामिनी विठ्ठल जुनघरे दिवदेववाडी

रमेश नाना म्हस्कर सावली , कमल जुनघरे सावली , हभप कल्याण महाराज इथापे विजेते आहेत 

        दि ९ मे रोजी काला किर्तना नंतर श्री विठ्ठल मंदिर ते श्री केदारेश्वर मंदिर मोठ्या उत्साहात दिंडी काढणेत आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे प्रांगणात सर्व भाविकांना महाप्रसाद देवून सोहळा संपन्न झाला

     शिवजन्मोत्सव निमित्त मेढा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील मॅडम यांचे हस्ते ध्वजपुजन करणेत आले शिवभक्तांचे उपस्थितीत मामुर्डी गावचे प्रथम नागरीक जगन्नाथ राऊ धनावडे यांचे हस्ते स्मारकाचे पुजन करून अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालणेत आला परिसरातील सर्व शिवज्योत पथकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास भेटी दिल्या सदर पारायण सप्ताह यशस्वी करणेसाठी श्री केदारेश्वर भजन मंडळ , श्री केदारेश्वर विकास मंडळ , छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब , महिला मंडळ , सर्व ग्रामस्थ तसेच पारायण मंडळाचे सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली 


टिप:- अखंड हरीनाम सप्ताह मध्ये काल्याचे किर्तन संपत असताना एक ग्रहस्थ माऊलीच्या मंडपात आला त्याचे अंगावर पूर्ण मळलेली वस्त्रे होती अंगावरील वस्त्रावरून तो भिकारी वाटत होता त्यावेळी ज्ञानदेव भाऊ माईक वरून देणगी पुकारत असताना सदर व्यक्तीने आपल्या मळलेल्या झोळीतून २१/- एकवीस रुपये काढून माऊलीच्या महाप्रसादासाठी देणगी दिली त्यावेळी कळत नकळत सर्वांनी त्याला हात जोडले कारण देव कोणत्या रूपात प्रकट होईल काही सांगता येत नाही काही क्षणभर मंडपात शांतता पसरली नंतर पारायण मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांचे वतीने त्याचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचे पंगतीमध्ये बसुन त्याने प्रसाद सेवन केला आणि तो ग्रहस्थ मार्गस्थ झाला सदर व्यक्तीची सर्व भाविक भक्त दिवसभर चर्चा करीत होते

Post a Comment

0 Comments