खासगी सावकारीतून तरुणास अमानुष मारहाण.
खासगी सावकारीतून तरुणास अमानुष मारहाण.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-------------------------------------
नागाव,ता.हातकणंगले येथील सागर सुधाकर समुद्रे वय वर्षे - 37 या युवकास नग्न करून मारहाण करणेत आली आहे. ही मारहाण वैभव माजगावकर, धनाजी गुरव रा.शिरोली पुलाची व अभिजीत शिंदे,रा.संभाजीनगर, नागाव यांनी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की,सागर सुधाकर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कामास आहे. दोन महिण्यापूर्वी आजारी असलेने दवाखाण्यासाठी 5000/-रुपये वैभव माजगावकर यांचेकडून घेतले होते. त्यावेळी सागरने कोरा चेक वैभव ला दिला होता. या प्रकरणात वैभवने सागर च्या मागे पैशासाठी तगादा लावला होता.
त्यामुळे बुधवार दि.8 मे 2024 रोजी सागर व त्याचा मित्र अभिजित यांनी नागाव फाटा येथे वैभवला बोलावून घेतले त्यावेळी वैभव बरोबर धनाजी गुरव हा वैभव चा मित्र हि आला त्यानंतर तेथून औद्योगिक वसाहितीत
मद्य प्राशन केले.त्यावेळी पैशाचा विषय निघाला असता सागरने त्यांना 5000/-रुपये दिले.उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले. पण वैभव ,धनाजी व अभिजित ने उर्वरित पैसे आताच्या आत्ता पाहिजेत म्हणून सागर यास नग्न करून बेदम मारहाण केली. थोडयावेळाने सागर च्या पत्नीचा फोन आला असता तिलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याने पैसे नाही दिले तर तू फेडायचे,नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून घ्यायचे अशी धमकी दिली. तसेच पोलीस स्टेशन ला तक्रार दिली तर तुम्हाला सोडणार नाही.माझी पोलीस स्टेशन तसेच सगळीकडे ओळख आहे,त्यामुळे मला कोण काय करू शकत नाही. या लोकांच्या दहशती पोटी सागरने तक्रार दिली नव्हती.अखेर त्याच्या मित्रमंडळींनी त्याला विश्वासात घेऊन शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली.घटना घडून तीन दिवस झाले तरी आरोपी अध्याप फरारी आहेत.
*सिंघम स्टाइल गुन्हेगारी लोकांवर वचक ठेवणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात खाजगी सावकाराणे दहशत माजवत अमानुष मारहाण करणेची धाडस करत घटना घडल्यानंतर हि आरोपी वारंवार सागर व त्याच्या पत्नीला फोन करून केस मागे घेण्यासाठी दबाव टाकत यंत्रणेला आव्हान देत आहे आहेत तरी तबल तीन दिवस सापडून आलेले नाहीत* त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणी सागर च्या पत्नीने केली आहे. शनिवारी दि.११ रोजी पहाटे आरोपींवर महाराष्ट सावकारी (निगमन)अधिनियम,२०१४ नुसार कलम ३९,४५ तसेच भारतीय दंड संहिता ३२४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत
Comments
Post a Comment