Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड शहरात सिंगल युज प्लास्टिक कॅरी बॅग चा सर्रास वापर.

 रिसोड शहरात सिंगल युज प्लास्टिक कॅरी बॅग चा सर्रास वापर.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर 

------------------------------

शहरात मागील काही दिवसापासून सिंगल न्यूज प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई बरोबरच प्लास्टिक बंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

         शहरात सध्या 50 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग सर्रास वापरल्या जात आहेत नगरपालिकेची प्लास्टिक निर्मूलन मोहीम थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे 

भाजीपाला विक्रेते, फळे विक्रेते, कटलरी विक्रेते न मागता हातामध्ये कॅरी बॅग देत आहेत शहरांमध्ये ५० मायक्राॅन पेक्षा कमी जाडीच्या कॅरी बॅग वापराला बंदी असली तरी आईस्क्रीम , ज्यूस , रसवंती , फळ , भाजीपाला , सोबतच विविध प्रकारचे कोणतेही छोटे-मोठे साहित्य खरेदी केल्यावर थेट कॅरी बॅग ग्राहकाला दिल्या जात असल्याचा प्रकार रिसोड शहरात सर्वत्र राजरोसपणे दिसून येत आहेत बाजारपेठेत उन्हाळ्यामुळे भाजीपाला , फळ , रसवंती यासह विविध प्रकारच्या हात गाड्यावर मिळणाऱ्या वस्तू खाद्यपदार्थ अशा ठिकाणी कॅरी बॅगचा राजरोसपणे वापर केला जात आहे याकडे नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने दिसून येत आहे 

शहरातील प्रमुख चौक अंतर्गत रस्त्यालगतच्या नाली जवळ तसेच परिसरात कुठेही प्लास्टिक कचरा कॅरीबॅग टाकल्या जातात शिवाय या ठिकाणाचा कचरा उचलून न नेल्यास तो जागेवरच पडून राहतो अशा ठिकाणी जनावरे हा कचरा पांगवितात शिवाय काही जनावरांकडून प्लास्टिक खाल्ल्यामुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे तहसीलदार तेजनकर यांनी मागील वर्षी पावसाळ्यापूर्वी प्लास्टिक बंदी व निर्मूलन यासाठी शहरातून रॅली काढली काढून घेणे जागृती केली होती व व्यापाऱ्यांना कॅरीबॅग न वापरण्याचे आवाहन केले होते तशेच नगरपरिषद सभागृहामध्ये व्यापाऱ्यांची सभा घेऊन त्यांना याबाबत माहिती देऊन कॅरीबॅग बंद करण्याबाबत आवाहन केले होते काही दिवस प्लास्टिक बंदी दिसून आली त्यानंतर मात्र हळूहळू कॅरीबॅगचा वापर सुरू झाला आज शहरात सर्वत्र सिंगल युज कॅरी बॅग वापर वाढला आहे सध्या पावसाळा तोंडावर आला असून नालेसफाई बरोबरच प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments