गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी रिसोड नगरी सज्ज 22 जुन ला रिसोड येथे आगमन.

 गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्वागतासाठी रिसोड नगरी सज्ज 22 जुन ला रिसोड येथे आगमन.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

----------------------------------------


 रिसोड पालखी मार्गावर होणार टाळ मृदंगाचा गजर.


शेगाविचा रांना संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज   22जून रोजी रिसोड नगरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रिसोड नगरी सज्ज झाली आहे.


 दरवर्षीप्रमाणे संत गजानन महाराजांची  पालखी सोहळा पंढरपूर  वारीकर्ता शेगाव येथून दिनांक 13 जून2024 रोजी प्रस्थान झाले आहे. महाराजांचा पालखी सोहळा मजल दरमजल करत टाळ मृदुंगाच्या गजरात व विठू माऊलीच्या  नाम घोषाने डव्हा , मालेगांव येथून चिंचाबापेन मार्गे22 जून रोजी रिसोड येथे दाखल होणार आहे. पालखी सोहळा अमरदास बाबा रिसोड फाटा पासून पोलीस स्टेशन समोरून मेन रोड मार्गे  पालखी सोहळा  मार्गक्रमण करणार आहे. रात्रीचा मुक्काम परंपरेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड च्या प्रांगणातील  ओट्यावर राहणार आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या या  संस्थानवर पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था संस्थांनच्या वतीने  करण्यात आली आहे. दिनांक 23  जून रोजी पालखी सोहळा ही एकात्मतेची शिदोरी घेऊन सकाळीच येथून पानकनेरगाव मार्गे सेनगाव  कडे प्रस्थान करणार आहे.  पालखी सोहळ्यातील सर्व श्रींच्या सेवकांची भोजन व निवास व्यवस्था मार्केट कमिटीच्या ओट्यावर करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. रिसोड शहरातील व तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना या पालखी सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच अनेकांकडून चहा,नास्ता, निंबूपाणी, व इतर गरजू वस्तू वाटप करण्यात येणार आहेत. दरम्यान हजारो भाविक भक्त पालखी सोहळा पाहण्यासाठी व  दर्शनासाठी रिसोड नगरीत होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.