सराईत चोरट्यांना अटक घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस 4.96.200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

 सराईत चोरट्यांना अटक घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस 4.96.200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

-------------------------------------

फ्रंटलाईन  न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे व इलेक्ट्रॉनिक मोटर चोरीचे प्रकार वारंवार घडत आहेत 

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार मुकेश जाधव गोसावी व त्यांच्या साथीदारांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केली असुन गुन्ह्यातील चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटारी विकण्यासाठी तो व त्याचे साथीदार आज दि. 15/06/2024 रोजी सांगली फाटा मार्गे, कोल्हापूर येथे येणार आहे. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, सतिश जंगम, संजय हुंबे, अमित मर्दाने, संजय इंगवले, महेश खोत यांचे पथकाने लोणार सांगली फाटा येथे सापळा लावून आरोपी  1 ) मुकेश गणपती जाधव गोसावी रा. पंचगंगा साखर कारखान्याजवळ, भारतमाता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर व त्याचे साथीदार 2 ) उमेश गणपती गोसावी रा. कृष्णनगर, गैबान पेट्रोल पंपाजवळ, उर्दु शाळेजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, 3) अभिषेक विलास घाडगे रा. पंचगंगा साखर कारखान्याजवळ, भारतमाता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटारी एकुण 7, तांब्याची भांडी एकुण 123, तांब्याचा बंब 1, पितळी समई एकुण 03, पितळी भांडी एकुण 24, अल्युमिनीअमची भांडी एकुण 13, स्टिलची भांडी एकुण 85 व इतर साहीत्य असे एकुण 4,96,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कोल्हापूर जिल्ह्यातील एकुण 06 घरफोडीचे गून्हे स्थानिक गून्हे अन्वेषण विभागाने आज उघडकीस आणले 


त्यांनी 02 एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे सांगितले व ईतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपीकडून उघडकीस आलेले गुन्हे राधानगरी 03 हातकणंगले 04 हातकणंगले मुरगूड ,वडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे सांगितले स्थानिक गून्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यांनी चोरलेला   2,64,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल 73,200/-रूपये किमतीचा मुद्देमाल | 35,000/-रूपये किमतीचा मुद्देमाल 72,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल 12,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल | 65,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल


आरोपीकडून वरीलप्रमाणे घरफोडी-चोरीचे एकूण 06 गुन्हे उघडकीस आले असून आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.


आरोपी नाम मुकेश गणपती जाधव गोसावी याचे विरूध्द यापुर्वी 10, उमेश गणपती गोसावी याचेवर 06 व अभिषेक विलास घाडगे याचेवर 03 असे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.


सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, सतिश जंगम, संजय हुंबे, अमित मर्दाने, संजय इंगवले, महेश खोत यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.