Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा येथील हद्दपार सराईत आरोपी चंद्रकांत शिरसागर यास अटक.नांदेड एलसीबी ने केले अटक.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

--------------------------------

दि. 26/6/24 लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर याच्यावर लोहा पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल होते.

 सदर आरोपी हा सतत एका मागून एक गुन्हे करत होता त्याच्यावर प्रतिबंधक कारवाया करून पण काही सुधारणा झाली नसल्यामुळे लोहा पोलिसांनी त्याचा हद्दपार प्रस्ताव पाठविला होता.

 उपविभागीय दंडाधिकारी कंधार श्रीमती अरुणा संगेवार मॅडम यांनी त्याचे हद्दपारचे आदेश काढले होते.

 सदर आरोपीस नांदेड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते.

 हद्दपार करण्यात आले असूनही त्याने पुन्हा नांदेड शहरांमध्ये प्रवेश केला होता.सदर हद्दपार आरोपी नांदेड शहरांमध्ये आलेला असल्याबाबत गोपनीय माहिती नांदेड एलसीबीला प्राप्त झाली.

 नांदेड एलसीबीने नांदेड शहरातून हद्दपार आरोपी चंद्रकांत क्षीरसागर यास अटक केले आहे.

 नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 व भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment

0 Comments