Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा अन्यथा आंदोलन - काँग्रेस पक्षाचा इशारा.

 घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा अन्यथा आंदोलन - काँग्रेस पक्षाचा इशारा.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

--------------------------------

                 लोहा पालिका हद्दीतील प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत अनेक नागरिकांनी पालिकेकडे अर्ज केला. पात्र लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली व घरकुल पूर्ण होवून देखील लाभ मिळत नसल्यामुळे लोहा काँग्रेस कमिटीच्या वतीने पालिका प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून लाभार्थ्यांना तत्काळ लाभाची रक्कम देण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

            लोहा नगर परिषद कार्यालया अंतर्गत गरजू गोरगरीब नागरिकांसाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना कार्यान्वित करण्यात आली. शहरातील नागरिकांनी पालिकेकडे रीतसर अर्ज करून पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर झाली. त्यानुसार बहुतांश लाभार्थ्यांनी भाड्याच्या घरात राहून तसेच व्याजी कर्ज काढून घरकुल उभे केले. परंतु घरकुल पूर्ण होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर घरकुलाची थकित रक्कम जमा करण्यात आली नाही. सदरील थकीत रक्कम तात्काळ वितरीत करण्यात यावी अन्यथा काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काँग्रेस शरद पाटील पवार यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिले आहे.

    यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चे जिल्हाउपाध्यक्ष अकबर मौलाना, युवक काँग्रेस अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, आनंद पाटील आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments