शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांचा उंचगाव कमान येथे जल्लोष: घेतली निष्ठेची शपथ.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांचा उंचगाव कमान येथे जल्लोष: घेतली निष्ठेची शपथ.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी /- उंचगाव कमान येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर आज करवीर शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापून व फटाक्यांची आतषबाजी करून शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याची एकनिष्ठतेचे शपथ सर्व शिवसैनिकांनी घेतली " आम्ही सर्व शिवसैनिक श्री छत्रपती शिवरायांना साक्षी मानून शपथ घेतो की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष व चिन्हा सोबत आम्ही सर्व शिवसैनिक एकनिष्ठ राहणार, एकनिष्ठ राहणार, एकनिष्ठ राहणार, अशी शपथ घेण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार , करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुखे, पोपट दांगट, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, उपतालुकाप्रमुख दिपक पाटील, अरविंद शिंदे , सुनील पोवार, शरद माळी, राहुल गिरूले, दिपक पोपटाणे, योगेश लोहार, कैलास जाधव, उल्फत मुल्ला, शफिक देवळे, सुरज पाटील, अजित पाटील, बाळासाहेब नलवडे, राजू सांगावकर, बंडा पाटील, अनिल पाटील, सुरज लोखंडे, सुनील पारपाणी, दीपक फोटो फ्रेम, महेश सचदेव, संदीप शेटके, अनिल माळी, वसंत पवार, बाबुराव पाटील पैलवान, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, सचिन नागटिळक, वसंत पोवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment