दाजीपूर बस स्टॅन्ड येथे एसटी बस पलटी पाच जण जखमी.
दाजीपूर बस स्टॅन्ड येथे एसटी बस पलटी पाच जण जखमी.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
देवगड निप्पाणी राज्य मार्गांवरील दाजीपूर बस स्टॅन्ड येथे मालवण हून पुण्याला जाणारी 'मालवण निगडी' एम एच १३ सी. यु. ८७२८ ही एस टी बस वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाली. ही घटना सकाळी १०:३० च्या सुमारास घडली. या मध्ये असणारे पाच प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील, दोघांची नावे उपलब्ध झाली नाही सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण एस टी बस चे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळाल्या माहितीनुसार दाजीपूर बस स्टॅन्ड येथे वळणाचा अंदाज न आल्याने एसटी बस पलटी झाली या अपघातात महिला वैभवी सचिन पाटील, प्रिया प्रकाश पाटील, लता भरत मांजरेकर सर्व राहणार ओलवण या किरकोळ जखमी झाल्या सदरची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राधानगरी पोलीस स्टेशन व राधानगरी आगार व्यवस्थापकांना कळवले त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.
अपघातात जखमी झालेल्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्या जखमींना राधानगरी एसटी आगाराकडून प्राथमिक उपचार साठी प्रत्येकी पाचशे रुपये देण्यात आले असल्याची माहिती राधानगरी एसटी आगारातून देण्यात आली
Comments
Post a Comment