Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ॲड.नकुल देशमुखांच्या पुढाकाराने अडोळ धरणाच्या खोलीकरणास सुरुवात.

 ॲड.नकुल देशमुखांच्या पुढाकाराने अडोळ धरणाच्या खोलीकरणास सुरुवात.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-------------------------------

ॲड.देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत गाळ उपसा कामास सुरुवात.

भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने रिसोड व शिरपूर शहरास मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अडोळ धरणाचे खोलीकरण कामास सुरूवात झाली आहे.

भाजप नेते ॲड नकुल देशमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत अडोळ धरणातून गाळ उपसा सुरू झाला असून रिसोड व शिरपूर शहरात होणाऱ्या पाणीटंचाईपासून मुबलक पाणीसाठा या खोलीकरणामुळे या धरणात असणार आहे त्यामुळे रिसोड व शिरपूर शहरातील नागरिकांच्या पाणीटंचाई पासून मुक्तता होण्यासाठी ही बाब अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

मागील काही वर्षापासून रिसोड व शिरपूर शहरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईस सामोरे जावे लागत होते. सदर दोन्ही शहरास आडोळ धरणातून पाणीपुरवठा होत असे. परंतु अपुरे पाणी असल्याकारणाने दोन्ही शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी हे वापरासाठी उपलब्ध होत नसे. ही बाब हेरून रिसोड व शिरपूर शहरातील अनेक संघटना, व्यापारी वर्ग, व सामान्य नागरिकाकडून यावर मार्क काढून हे पाणी टंचाईची समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्याकडे भेटून मागणी केली होती. ही समस्या बघता भाजप नेते ॲड देशमुख यांनी पुढाकार घेत अडोळ धरणाच्या खोलीकरण करण्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी पुढाकार घेतला याचेच फळ म्हणून दिनांक १ जून रोजी खोलीकरणाच्या कामास सुरुवात झाली. या धरणातून गाळ उपसा करण्याची सुरुवात ॲड.नकुल देशमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. सदर आडोळ धरणाचे खोलीकरण झाल्याने मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहराच्या पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.


*जनतेकडून मागणी ॲड.नकुल देशमुख यांच्या कडून तत्काळ दखल व खोलीकरणास सुरुवात*

शिरपूर व रिसोड शहरातील नागरिकांसाठी पाणीटंचाईमुळे यामुळे रिसोड शहरातील विविध संघटनांनी व नागरिकांनी नकुल देशमुख यांच्याकडे यावर मार्ग काढण्याची विनंती केली होती. तसेच शिरपूर शहरातूनही पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्याच्या संदर्भामध्ये नागरिकांनी मागणी केली होती. या समस्येची तात्काळ दखल घेत त्यावर मार्ग काढत भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी आडोळ धरणातील गाळ उपसा करून खोलीकरण करण्याच्या कामात पुढाकार घेऊन या कामाचा शुभारंभ अतिशय कमी कालावधीत सुरुवात केला यामुळे शिरपूर व रिसोड शहरातील नागरिकाकडून त्यांच्या या तत्परतेचे व प्रश्न सोडवल्याबद्दल कौतुक आभार व्यक्त होत आहे. सोबतच आडोळ धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सुपीक गाळ उपलब्ध होत आहे. अतिशय शिस्तबद्ध योजना जनतेने केलेल्या मागणीचे तात्काळ दखल घेऊन पूर्णत्वास नेलेले काम. यामुळे जनतेकडून समाधान व्यक्त होत आहे

यावेळी कार्यक्रमास दीपक लोहा, मोहन केंद्रे,रिसोड चे मुख्याधिकारी सतीश जी शेवदा, उत्तम शेठजी बगडीया, संजयराव उकळकर, सुरज गुप्ता,जिल्हा परिषद सदस्य अमोल पाटील भुतेकर, पुरुषोत्तम तहकीक्,सुभाषराव खरात, पंचायत समिती सदस्य भूषण पाटील, संदीप धांडे, पंकज राव देशमुख, प्रदीप राव देशमुख, नंदकिशोर उलाम आले, गजाननराव देशमुख, ग्रामपंचायत वाघी तसेच परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच सदस्य नागरिक तसेच रिसोड व शिरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments