राधानगरी तालुक्यातील शेतकरी चिंतातूर.
राधानगरी तालुक्यातील शेतकरी चिंतातूर.
-----------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-----------------------------------
आकाशात काळे ढग दाटून आले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे.चालु वर्षी मान्सून पाऊस लवकर सुरू होण्याची शक्यता होती.परंतु पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहे.
तालुक्यात ऊस भात,नाचणा, भुईमूग, सोयाबीन पिकाचे प्रमाण अधिक असते.तालुक्यातील काही भागात भाताची टोकण पध्दत असते तर इतर ठिकाणी रोप लागण असते.रोप पध्दतीला जादा पावसाची गरज असते परंतु चालू वर्षी पाऊस सुरू झाला नसल्याने रोप लावण वेळाने होण्याची शक्यता आहे.वळवाच्या पावसाने ऊस पिकास तारले आहे.परंतु भात आणि इतर पिकांना पावसाची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे.
Comments
Post a Comment