Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राऊतवाडी धबधबा प्रवाहित राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला.

 राऊतवाडी धबधबा प्रवाहित राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला.


-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

यावर्षी मान्सूनचा पाऊस लवकर चालू झाला असून अनेक लोकांना हा एक प्रकारचा दिलासा देणारा सुखद काळ आहे. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आतापासूनच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळतय.. आज महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पाऊस पडला असून दिवसभर राधानगरी परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली. राधानगरी परिसराच वैशिष्ट्य म्हणजे या भागात अनेक पर्यटन स्थळे आहेत.यापैकी राऊतवाडी धबधबा हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.... दरवर्षी पावसाळा चालू झाला म्हणजे लोकांना राऊतवाडी धबधबा सुरू होण्याची उत्सुकता लागते. कारण या धबधब्याचे सौंदर्य इतक मनमोहक आहे की ते पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात..यावर्षी हा धबधबा लवकरच चालू झाला असून अनेक पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे धाव घेत आहे.

Post a Comment

0 Comments