Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ट्रक आणि कारच्या अपघातात चालक जागीच ठार.

 ट्रक आणि कारच्या अपघातात चालक जागीच ठार.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील

------------------------- 

         नागणवाडी येथे भरधाव ट्रक आणि कारच्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला आहे. वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या कारला चुकविण्यासाठी ट्रकचा ब्रेक मारल्याने तो उलटला. बेळगाव-वेंगुर्ले रस्त्यावर झालेल्या या अपघातात ट्रकचालक अर्जुन (रा. इटगी, जि. बेळगाव) जागीच ठार तर (एम.एच. ०७ ए.जी. ६१६९) कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडीकडून चिऱ्याने भरलेला ट्रक (के.ए. २२ सी. १२६९ ) भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने जात असताना नागणवाडी येथील वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या कारला चुकविताना ट्रक चालकाने करकचून ब्रेक दाबला. पण, ट्रक इतका वेगात होती की गाडी उजव्या दिशेने रस्ता सोडून जाऊन उलटून समोरून येणाऱ्या कारला धडकली. या अपघातानंतर कार मधील एअर बॅग बाहेर आल्याने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. कारमधील प्रवासी देवगडच्या दिशेने चालले होते. बेळगावला औषध उपचार करून ते घरी परतत होते. कारमधील जोत्स्ना संकेत लबडे (वय ५५) यासह आणखीन एकजण जखमी झाला असून उलट्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला गावच्या तरुणांनी बाहेर काढण्याचा अथक प्रयत्न केला. पण यश आले नाही. रात्री उशिरापर्यंत क्रेन आणून ट्रक चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. ट्रक चालक हा कर्नाटकातील असून त्याचे नाव अर्जुन एवढेच प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. घटनास्थळी चंदगड पोलीस दाखल झाले. पाठोपाठ रुग्णवाहिकाही आली. जखमींना चंदगडच्या दिशेने नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ट्रकच्या चालकाच्या मृत्यू बदल हळहळ व्यक्त होत होती.

Post a Comment

0 Comments