माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी सहपरिवार "श्री" पालखीचे आगमन प्रसंग घेतले दर्शन.

 माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी सहपरिवार "श्री" पालखीचे आगमन प्रसंग घेतले दर्शन.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------------

 भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड तालुक्यात आगमन प्रसंगी संत गजानन महाराज पालखी शेगावचे चिंचाबा पेन भारत माध्यमिक शाळा येथे सहपरिवार दर्शन घेतले. 

संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन दोन दिवसापूर्वी रिसोड मालेगाव विधानसभेत झाले आज सदर पालखीचे आगमन रिसोड तालुक्यात झाले प्रसंगी चिंचांबा पेन येथे भारत माध्यमिक शाळा परिसरात माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी सहपरिवार संत गजानन महाराज पालखी शेगाव चे दर्शन घेतले. मतदार संघ वाशिम जिल्हा तसेच महाराष्ट्र व देशभरातील जनतेवर संत गजानन महाराज याची कृपादृष्टी सदैव राहो अशी प्रार्थना माजी मंत्री देशमुख यांनी संत शिरोमणी गजानन महाराज चरणी केली.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.