सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर अखेर तडीपार दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यामधून तडीपार.

 सराईत आरोपी चंद्रकांत क्षीरसागर अखेर तडीपार दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यामधून तडीपार.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

आंबादास पवार

--------------------------

 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 प्रमाणे कारवाही.

राजकीय पक्षाचा तालुकाप्रमुख 

दि. 19/6/24 पोलीस स्टेशन लोहा हद्दी मधील आडगाव येथील चंद्रकांत मोहन क्षीरसागर यांस लोहा पोलिसांनी पाठवलेल्या तडीपार प्रस्तावावरून उपविभागीय दंडाधिकारी कंधार अरुणा संगेवार मॅडम यांनी दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यामधून हद्दपार केले आहे.

 त्यामुळे दोन वर्ष नांदेड जिल्ह्यामध्ये सदर तडीपार व्यक्तीस राहता येणार नाही.


 लोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील आडगाव येथील राहणारा चंद्रकांत मोहन क्षीरसागर हा व्यक्ती 2016 पासून सराईतपणे गुन्हे करत आहे. सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यास कायदेशीर कारवाई पण करण्यात आलेली आहे.

अनेक वेळा प्रतिबंधक कारवाई करुनही सदर व्यक्तीच्या वर्तनामध्ये परिवर्तन होत नाही.


 सदर व्यक्तीची मागील हिस्ट्री पाहिली असता सदर व्यक्ती हा पुन्हा पुन्हा अपराध करण्याच्या बेतात दिसून येतो.

 सदर व्यक्तीच्या हालचाली कृती या व्यक्तीस व मालमत्तेस भय धोका किंवा इजा निर्माण करण्याच्या दिसून येतात तसेच असा धोका इजा निर्माण होण्याचा संभव ही दिसून येतो.


सदरचा व्यक्ती हा जबरीचा किंवा बळाचा उपयोग करून गुन्हे करतो.

 तसेच सदर व्यक्तीने अशा प्रकारचे गुन्हे इतरांनी करावे म्हणून अपप्रेरणा पण दिलेली आहे.

 सदर व्यक्तीवर पोस्टे लोहा येथे बेकायदेशीर जमाव जमवणे बेकायदेशीरपणे दंगा करणे, जबर मारहाण करणे, रेती चोरी करणे, अवैध हत्यार तलवार बाळगणे, सार्वजनिक मालमत्ता नुकसान करणे सार्वजनिक मालमत्तेचे वीरूपण करणे अशा गुन्ह्यास अपप्रेरणा देणे, सायबर क्राईम इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

 सदर आरोपीवर भारतीय दंड विधान 1860, शस्त्र अधिनियम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 महाराष्ट्र मालमत्ता विरूपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 प्रमाणे सदर आरोपी विरोधात पोलीस स्टेशन लोहा येथे गुन्हे दाखल आहेत,


 *सदर आरोपी वर लोहा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले गुन्हे*


गुन्हा क्रमांक - 125/2016

भादवी कलम- 147, 148, 149, 326, 324, 504, 506


गुन्हा क्रमांक - 165/2020

भादवी कलम- 379 रेती चोरी 


गुन्हा क्रमांक - 61/2024

शस्त्र अधिनियम कलम - 4/25


गुन्हा क्रमांक - 56/2024

1)भादंवि कलम - 427, 34, 109

2) सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधि 1984,कलम - 3

3)महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधि.1995 कलम - 3


 सदर आरोपीने आपल्या वडिलांच्या मदतीने बेकायदेशीर जमाव जमून जबर मारहाण केली असल्याबाबत पोस्टे लोहा येथे गुन्हा क्रमांक 125/2016 प्रमाणे सदरचा आरोपी व त्याचे वडील मोहन शामराव शिरसागर यांच्यावर गुन्हा दाखल होता.


 सदरचा आरोपी हा वारंवार गुन्हे करण्याच्या सवयीचा असून सामान्य माणसाच्या जीवास मालमत्तेस भय धोका इजा निर्माण करण्याचा दिसून येतो. तसेच सदरचा आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे व त्याच्या आशा वर्तनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता वाटत असल्यामुळे

 सदर आरोपीला हद्दपार करावे यासाठी पोलीस स्टेशन लोहा तर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.


 लोहा पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावावरून उपविभागीय दंडाधिकारी कंधार अरुणा संगेवार मॅडम यांनी दोन वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

 तसेच तो जिल्ह्याच्या बाहेर ज्या ठिकाणी वास्तव्यास राहणार आहे त्या ठिकाणच्या नजीकच्या पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात कळवून प्रत्येक महिन्यातून एकदा हजेरी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी लागणार आहे. संबंधित आरोपी जर राज्याबाहेर गेला तर त्याने तात्काळ लेखी स्वरूपात संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यायची आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.