Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बरगेवाडी येथील दादासाहेब पाटील कौलवकर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती बरगे, आणि उपाध्यक्ष पदी धनाजी बरगे यांची बिनविरोध निवड.

 बरगेवाडी येथील दादासाहेब पाटील कौलवकर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती बरगे, आणि उपाध्यक्ष पदी धनाजी बरगे यांची बिनविरोध निवड.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कौलव प्रतिनिधी 

संदिप कलिकते

--------------------------------


राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी येथील कै दादासाहेब कृष्णराव पाटील कौलवकर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी मारुती नाना बरगे तर उपाध्यक्षपदी धनाजी गुंडू बरगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून युशेब  शेख यांनी काम पाहिले  रामचंद्र गोपाळ बरगे व शहाजी रामचंद्र बरगे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे राजीनामे दिल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त होती

निवडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी फटाक्याची आताषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला

सत्कार प्रसंगी नूतन अध्यक्ष मारुती बरगे बोलताना म्हणाले आपल्या  कालावधीत संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासणार असून सभासदांनी घेतलेली कर्जाची परतफेड वेळेवर करणे गरजेचे आहे यावेळी संस्थेच्या वतीने नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला

संस्थेचे माजी अध्यक्ष रामचंद्र बरगे यांनी गेल्याच महिन्यात सहकार मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे चार दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते

या निवडी वेळी संस्थेचे संचालक कृष्णात बरगे, सुरेश बरगे, महादेव मुंडे, श्रीकांत बरगे, महिला प्रतिनिधी हौसाबाई बरगे, अनिता बरगे उपस्थित होत्या प्रस्ताविक व आभार संस्थेचे सचिव के वाय चौगले यांनी मानले

Post a Comment

0 Comments