Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बाळखेड येथे "वटपौर्णिमेचा नवा संकल्प,जागो जागी लावु वटवृक्ष" कार्यक्रमाचे आयोजन.

 बाळखेड येथे "वटपौर्णिमेचा नवा संकल्प,जागो जागी लावु वटवृक्ष" कार्यक्रमाचे आयोजन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकूर

-----------------------------------

वृक्ष लागवड,संवर्धन व त्यांची कटाई यामधील व्यस्त प्रमाणामुळे गेल्या पंचवीस वर्षापासुन तापमानाच्या वाढत्या आलेखाने जीवाची लाही-लाही होत आहे,याची जाणं सर्वांनाच आहे.हैद्राबाद मध्ये उभ्या दुचाकी वाहनांनी घेतलेला पेट,हज यात्रे दरम्यान आत्तापर्यंत 700 यात्रेकरूंचा गरमीने होणारा मृत्यू,नागपूरच्या सराफा दुकानामध्ये ए.सी.चा झालेला स्फोट,राजस्थानच्या चुरू शहरातील 51 सें. तापमानामुळे प्रशासनाला रस्त्याच्या कडेला उभे राहून फव्वार्याच्या रूपाने करावा लागलेला थंड पाण्याचा छीडकावा ईत्यादी जीवघेण्या वाढत्या तापमानाची उदाहरणे आहेत.  यापुढे वृक्षतोड आणि वृक्षलागवडी मध्ये अशीच तफावत राहली तर कुलर व ए.सी.सुध्दा कवडीमोल होतील ही काळ्या दगडावरील रेघ आहे असे मत "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री  पुरस्कार" प्राप्त गजानन मुलंगे यांनी श्री.बाळनाथ महाराज मंदिर परिसरात मध्ये आयोजित "वटपौर्णिमेचा नवा संकल्प,जागो-जागी लावु वटवृक्ष" कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमा करिता सौ.राणी पर्हाड सरपंच ग्रा.पं.बाळखेड,विष्णु जटाळे वनपाल सामाजिक वनिकरणं परिक्षेत्र रिसोड,वृक्षमित्र सचिन पर्हाड,शंकर थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुलंगे पुढे म्हणाले कि,आज योग दिन सुध्दा आहे.नित्यनियमाने शुध्द हवामाना मध्ये केलेल्या योग साधनेमुळे निश्चितचं मन आणि शरीर सुदृढ राहते या मध्ये तिळमात्र शंका नाही पण हवामान शुध्दी साठी वृक्षांचीच आवश्यकता असते,हे विसरून कसे चालणार?आजपर्यंत सुहासिनींनी गाव कुसातील उपलब्ध वडाच्या झाडांची पूजा केली हे खरे पण यापुढे  काळाची गरज लक्षात घेता गटागटाने महिलांनी फक्त एकच वटवृक्ष लावावे व त्याचे संवर्धन करून पर्यावरण संतूलनास हातभार लावावा असा मोलाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.कार्यक्रमा दरम्यान विविध ठिकाणी एकूण 151 वृक्षांचे रोपण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्विते साठी सुशिला गायकवाड,वंदना ढोले,विमल पर्हाड,सुनिता गायकवाड,निर्मला गिरी,सपना चंदनगोळे,राधेश्याम गायकवाड,गोपाल देव्हडे,दिगंबर पर्हाड,संतोष खडसे,दिलीप गिरी,अमोल पर्हाड,हनुमान पर्हाड,विठ्ठल सोनूने,संजय तायडे, वसंता शिंदे ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments