शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणाचा धारधार शस्त्राने भोसकून खून.

 शिरोली येथे प्रेमप्रकरणातून तरुणाचा धारधार शस्त्राने भोसकून खून.

------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

------------------------------------

पुलाची शिरोली,ता.हातकणंगलेगडे येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा सांगली फाटा नजीक बुधले मंगल कार्यालयाजवळ तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघड झाली आहे. संकेत खामकर ( वय वर्ष 19 ) रा.पाडळी ता. हातकणंगले असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री खून झाल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला तातडीने सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले.पण उपचार सुरू असताना या युवकाचा मृत्यू झाला.या युवकाच्या छातीवर खोलवर जखमा झाल्या होत्या.

              सविस्तर माहिती अशी की,

प्रेम प्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी

 धारधार शस्त्राने सपासप वार करून तरूणाचा निर्घृण खून केला . खुन झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्या आधीच जीवनातूनचं संपला आणि त्याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले . या युवकाचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारश्याचा कार्यक्रम होता.संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला घेवून बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजले. त्यानंतर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.या तरुणावर हल्ला होत होता .त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्याच्या सोबत आलेल्या मित्रास ही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल ही काढून घेतला. घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येवून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली . संकेतला वेळेवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता.संकेत पाच वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तीच्या माहेरी निघून गेली आहे. त्यानंतर आज पर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यानी केला होता.संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे. तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असे समजते. फरार झालेल्या आरोपींना अवघ्या 12 तासात पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सपोनि पंकज गिरी तपास करीत आहेत. 

त्याच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहिन असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.