Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आई वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेल्या‌ सिरसे येथील दोन मुलांच्या साठी कौलवचे कृष्णात बुवा झाले नाथ.

 आई वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेल्या‌ सिरसे येथील दोन मुलांच्या साठी कौलवचे कृष्णात बुवा झाले नाथ.

--------------------–-----

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

----------------------------

दोन वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले आणि गेले चार महिन्याूर्वी आईचे निधन झाले आई-वडिलांच्या दोघांच्या निधनामुळे सिरसे तालुका राधानगरीतील दोन मुले पोरकी झाली . नियतीच्या घाल्यामुळे त्या दोन मुलांच्या मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत हरवले आहे. कौलव येथील चंदनगीरी मोटार ट्रेनिंग स्कुलचे मालक कृष्णात बुवा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्या दोन मुलांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च कृष्णात बुवा ही करणार आहेत.

           सिरसे तालुका राधानगरी येथे पांडुरंग पाटील हे गवंडी काम फरशी बसवण्याचे काम करत होते. पाटील कुटूंबीय दोन मुला समवेत आनंदाने राहत होते. पांडुरंग यांची अचानक आजारी पडले त्याची शारीरिक तपासणी केली असता त्यांना कॅन्सरचा झाला असल्याचे समजले. एक दोन महिन्यांमध्ये उपचार करूनही त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी स्वाती पाटील यांना मोठा मानसिक धक्का बसला.आणि त्यांचे निधन झाले त्यांना दोन मुले आहेत अथर्व आठ वर्षे आणि रेवा पाच वर्षे. त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबीयावर नियतीने मोठा झाला घातला दोन मुलांच्या वरील मायेची छत हरवून गेले. सद्या ती मुले आपल्या मामाच्या गावी खामकर वाडी येथे राहत आहेत.कृष्णा बुवा बारा दिवसाच्या विधीच्या कार्यक्रमाला गेले असता त्यांना त्यांच्या कुटुंबीयांबद्दल घडलेली घटना समजली ती मुले पोरकी झाल्याची त्यांना लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्या मुलांना मानसिक पाठबळ देत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी बुवा यांनी करण्याचे ठरवले त्यामुळे त्या मुलांना शिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मानसिक बळ मिळाले बुवा यांच्या या दातृत्वामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगातही माणुसकी जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले .प्रसंग अवधान एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यानंतर त्यांच्या पाठीशी राहणे हे सध्या बघायला मिळत नाही. परंतु आजही माणुसकी जपणारे असंख्य हात आहेत हे त्यांनी दाखवून दिले यापूर्वी अनेक विद्यार्थी आणि गरजूंना कृष्णात बुवा यांनी आर्थिक शैक्षणिक मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments