आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल.
आरटीआय कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
गांधीनगर:- आर टी आय कार्यकर्ते अशोक चदंवाणी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजगोंडा बाळासो वळीवडे.रा वळीवडे ता करवीर यांच्यासह दोघा अज्ञात इसमांवर (नाव व पत्ता माहित नाही) गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद अशोक हदुमल चंदवानी रा.गांधीनगर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत गांधीनगर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी वळीवडे चे ग्रा.प सदस्य शरद नवले यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. असे असताना ही माहिती शासन दरबारी लपवून वळीवडे ग्रामपंचायत सदस्य पदी निवडणूक जिंकली. नवले यांच्या विरोधात संजय बापू चौगुले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अर्जाचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जूनला अपात्र म्हणून दिला. या आदेशाची प्रत व्हाट्सअप ग्रुप वर प्रसिद्ध झाली. त्याला कायदेशीर उत्तर देत असताना राजगोंडा वळिवडे यांनी व्हाट्सअप ग्रुप वरच चंदवाणी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकीचे मेसेज केले. आणि रात्री कोल्हापूरहून कुटुंबासह जेवण करून येत असताना तावडे हॉटेल तनवाणी वाईन्स समोरील ब्रिज खाली परिसरात अज्ञात व्यक्तींनी मला व कुटुंबाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार चंदवानी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून वळीवडेसह अज्ञात दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चौकट- राजगोंडा वळीवडे याच्यावर गु.र.नं 78/2008 ला फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
Comments
Post a Comment