अपक्ष उमेदवाराच्या मताधिक्याने सातारा च्या निकालात बदल.

 अपक्ष उमेदवाराच्या  मताधिक्याने  सातारा च्या  निकालात बदल.

-------------–-------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी

सूर्यकांत जाधव

-------------–-------------

सविस्तर :- सातारा लोकसभा मतदारसंघात  छत्रपती उदयन राजे भोसले हे 31432 मतांनी विजय झाले आहेत हे भाजपचे उमेदवार निवडणून आले असले तरी काटे की टक्कर असणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास   आघाडी चे  शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला अशी चर्चा सुरू असली तरी हा पराभव कसा झाला हा आश्चर्य चा धक्का बसला आहे कारण अपक्ष उमेदवार संजय गाडे यांनी घेतलेली मते बघितली असता त्यांनी 37067 मिळवली आहेत बेरजेचे गणित केले असता संजय गाडे हे आंबेडकरी चळवळीचा नेता म्हणून काम करतात मात्र प्रस्थापित वर्गाचे (पक्षश्रेष्ठीं) जे सत्ता स्थापनेचा दावा करतात ते आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना गृहीत धरतात आणि बहुजन समाज किंवा  इतर मतदार हे आपलेच असून काहीहि झालं तरी आपल्याच मतदान करणार हे मनोमनी ठरवून असतात यावेळी मात्र कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या संजय गाडे सारख्या उमेदवाराने दखलपात्र काम केले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे जिल्हा भर चर्चे ला उधाण आले असून सगळीकडे कुजबुज सुरू आहे कोण जिंकलं त्या पेक्षा हरल कोण त्याची कारणे शोधताना संजय गाडे यांना  सुज्ञ मतदारांनी दिलेल्या मतांचा आवर्जून उल्लेख होताना दिसत आहे  तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हां मुळे आमचा घात झाला या भ्रमात न राहता आगामी काळात संजय गाडे यांची प्रस्थापित लोकांनी दखल घेण्याची गरज आहे कारण तुतारी सारख्या चिन्हामुळे पराभव झाला नसून RPI चे जिल्हाध्यक्ष म्हणून मराठा आदिवाशी गोसावी फासेपारधी तमाशा कलावंत अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन अशा बहुजन वर्गाच्या अडीअडचणींना रात्री अपरात्री धावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कामाची सुज्ञ मतदारांनी दिलेली ही पोहच पावती होय असे चित्र सध्या या वेळी निर्माण झाले आहे.ही वस्तुस्थिती कधीही नाकारता येणार नाही अशी सर्वत्र चर्चा आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.