Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा येथे "जीवन गाणे गातच राहावे" गीतांचा कार्यक्रम.

 सातारा येथे "जीवन गाणे गातच राहावे" गीतांचा कार्यक्रम.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी 

-----------------------------

प दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित, "निर्झरा ग्रुप प्रस्तुत "'जीवन गाणे गातच राहावे. " या सदाबहार हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये रविवार दि.९ रोजी सायंकाळी ५।। वा. आयोजित केला आहे.

      सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व माजी मासचे अध्यक्ष राजेश कोरपे,

चार्टर्ड अकाउंटंट संजय सोमण, कार्यवाह म.सा.प. पुणे शिरीष चिटणीस,व्यवस्थापक दीपलक्ष्मी पतसंस्था विनायक भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सुजाता दरेकर व श्वेता जाधव या रसिक श्रोत्यांसाठी आपली सुमधुर गाणी सादर करणार आहेत.संकल्पना व नियोजन सुजाता दरेकर यांचे आहे.कुलदीप पवार यांची ध्वनी व्यवस्था लाभणार आहे.तेव्हा गीतांच्या बहारदार कार्यक्रमास समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून गीत मैफिलीचा आस्वाद घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments