कोवाडमध्ये जुन्या वादातून सराफाला मारहाण.
कोवाडमध्ये जुन्या वादातून सराफाला मारहाण.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------
कोवाड ( ता.चंदगड ) जुन्या वादाच्या रागातून माजी जिल्हा परिषद सदस्याने सराफाला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी चंदगड पोलिसात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्लाप्पा सत्तुराम भोगण (रा. कोवाड) यांच्यावर फिर्यादी ओंकार विजय सोनार तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती अशी आहे की, बुधवारी जुन्या वादाच्या रागातून आरोपीने फिर्यादीच्या दुकानात येऊन त्यांच्याशी वाद घालत हाताच्या ठोशाने मारहाण केल्याप्रकरणी चंदगड पोलिसात तक्रार केली.
Comments
Post a Comment