Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरा.

 रिसोड येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरा.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर

------------------------------------

भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी  .. येथील भूमि अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक पद प्रभारी असून उपअधीक्षक कायमस्वरूपी देण्यात यावा तसेच कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या आदेशाने युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ यांच्या नेतृत्वात तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच रिसोड येथील भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन देण्यात आले असून निवेदनात नमूद केले आहे की, येथील कार्यालयातील उपअधीक्षक पद प्रभारी असून इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.कायमस्वरूपी उपअधीक्षक तसेच कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणीची कामे लामणीवर पडत असून याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक पद कायमस्वरूपी देऊन तसेच इतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेले पदे त्वरित भरण्यात यावी अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ, तालुका उपाध्यक्ष जालिंदर देवकर (मंत्री), गजानन रासकर यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments