भणंग प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा.

 भणंग प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात साजरा.

---------------------------------------

 भणंग प्रतिनिधी 

 शेखर जाधव

---------------------------------------

 भणंग -- उत्तम आरोग्यासाठी योग शिक्षणाची गरज असून निरोगी व आनंदी जीवनासाठी नियमित योगासने करावीत असे आवाहन भणंग गावचे सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जगताप यांनी केले. 

जावली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या भणंग प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योगशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रेश्मा जाधव,शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. 

योग दिनानिमित्त मुख्याध्यापक डी.टी. धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक लकडे,आशा साळुंखे,विश्वास भिसे,रेणुका सिद्धेश्वर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रार्थना,पूरक हालचाली,योगासने,कपालभाती,प्राणायाम,ध्यानधारणा व संकल्प याबाबत मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली.यावेळी योग शिक्षक  डी.टी.धनावडे यांनी योगासनांचे महत्त्व विशद केले.उपस्थितांचे स्वागत अशोक लकडे यांनी केले तर आभार विश्वास भिसे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.