लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड तर्फे वृक्षारोपण

 लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड तर्फे वृक्षारोपण.

--------------------------------                   

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर 

---------------------------- 

 लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड तर्फे दिनांक 16 जून 2024 ला येथील मालेगाव नाक्यावरील ई चौपाल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय इलेक्शन कमिशन दिल्लीचे डायरेक्टर संतोषजी अजमेरा हे उपस्थित होते या कार्यक्रमास लायन्स क्लब रिसोड गोल्ड चे अध्यक्ष लॉयन गोविंद तोष्णीवाल, लायन्स क्लब ऑफ रिसोड मिडटावून चे अध्यक्ष डॉ. माधव मस्के, इ चौपाल  चे प्रमुख संचालक ओमसेठ  तोष्णीवाल, पुरुषोत्तम तोष्णीवाल  प्रामुख्याने उपस्थित होते सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ई चौपाल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी  आयोजित कार्यक्रमात भारतीय इलेक्शन कमिशन दिल्लीचे डायरेक्टर संतोषजी अजमेरा यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन लॉ.  गोविंद तोष्णीवाल तसेच लॉयन्स क्लब ऑफ रिसोड मीडडाऊन  चे अध्यक्ष लॉयन डॉ. माधव मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमाची संतोषजी अजमेरा यांनी प्रशंसा करून वृक्षारोपण ही आज काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावून ते जगवण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे पर्यावरण संतुलन होण्यास मदत होणार आहे असे सांगून   त्यांनी लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रशांत तोष्णीवाल, मुकुंद तोष्णीवाल  लायन्स क्लब ऑफ रिसोड गोल्ड चे सदस्य एडवोकेट भूषण देशमुख, मयूर गंजे,पंकज नायक, शिवाजी सानप,प्रसाद गांजरे,विशाल पातुरकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लायन डॉक्टर माधव मस्के यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.