लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे वृत्तांकन करण्यास डिजिटल मीडियाला मज्जाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .
लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेचे वृत्तांकन करण्यास डिजिटल मीडियाला मज्जाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .
-----------------------------------
फ्रंट लाईन न्युज् महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेदरम्यान डिजिटल आणि पोर्टल मीडियाच्या प्रतिनिधीना जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलीस दलाने मज्जाव केल्याबाबत आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी या विषयात जिल्हा प्रशासनाचा हस्तक्षेप नसून राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील हा विषय असल्याचे स्पष्ट केले. तथापि डिजिटल मीडिया आणि पोर्टल मीडियाला जिल्हा माहिती कार्यालयाकडून दररोज शासकीय दौरे आणि अनुषंगिक माहिती देण्याबाबत सूचना देण्याचे आश्वासन येडगे यांनी डिजिटल आणि पोर्टल मीडियाच्या शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे, जिल्हा सचिव नवाब शेख, जिल्हा संघटक विनोद नाझरे, शहर संघटक सागर शेरखाने, राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे करवीर तालुकाध्यक्ष जावेद मुजावर, शहर उपाध्यक्ष फरीद शेख, सुशांत पोवार आदिनी केले
Comments
Post a Comment