तुर्केवाडी येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता.
तुर्केवाडी येथून अल्पवयीन मुलगा बेपत्ता.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
----------------------------------
: तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील आयान मलिक ( शेख वय १५)हा १२ जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार वडील मलिक शेख यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
आयान हा बुधवारी गावातील बाजारात फिरत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले होते.पण तो उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने त्याची बाझारपेठेत शोधाशोध केली त्यानंतर पै पाहुणे यांच्याकडे हि विचारपूस केली. पण तो कुठेच मिळून आला नसल्याने वडील मलिक शेख यांनी कुणीतरी आज्ञताने आपल्या मुलाला फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार चंदगड पोलिसात दाखल केली आहे. तरी हा मुलगा कुठे निदर्शनास आला अथवा सापडल्यास 7887488827, 9527728307 या नंबरवर त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment