पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत फेजिवडे ग्रामस्थांना पिण्याचे पाईपलाईन टाकून देणार सरपंच प्रतिभा एकावडे.
पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत फेजिवडे ग्रामस्थांना पिण्याचे पाईपलाईन टाकून देणार सरपंच प्रतिभा एकावडे.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
, निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील फेजीवडे गावची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बाधित,गावाला पाणी टंचाई,पाईपलाईन घालून द्यावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आमरण उपोषणाचा फेजीवडे ग्रामस्थांनी दिला होता त्या संदर्भात आज राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये ग्रामस्थ व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्त बैठक घेण्यात आली त्यामध्ये 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये पिण्याची पाईपलाईन घालून देण्याच्या आश्वासन दिल्यावर कार्यालयावर टाळे व उपोषण मागे घेण्यात आले
निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधानगरी तालुक्यातील फेजीवडे इथली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्यात गाडली गेली,रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन घालून देण्याचं आश्वासन देऊनही फेजीवडे इथलं काम पूर्ण होऊन दोन वर्षे झालं तरी अध्याप पाईपलाईन घातलेली नाही त्यामुळं फेजीवडे गावाला पाणी टंचाई निर्माण झालीय,संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निपाणी देवगड राज्यमार्गाचे काम सुरू असताना राधानगरी तालुक्यातील फेजीवडे गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्याखाली गडल्यानं गावाला पाणी प्रश्न निर्माण झाला.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं पाईपलाईन नव्यानं टाकण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं,संबंधितांनी रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन घालून देण्याच्या आश्वासनानंतर रस्त्याचं काम सुरू करू देण्यात आलं होतं.रस्त्याचं काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप पाईपलाईन न घातल्यानं फेजीवडे गावाचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.
धरणाच्या गावच्या फेजीवडे गावचा पाणी प्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी पाईपलाईन घालण्याचं काम सुरू करत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी आज शुक्रवारी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची बैठक राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन पाईपलाईन घालण्याचा तोडगा पंधरा ते वीस ऑगस्ट घालून देण्याचे आश्वासन दिल्यावर कार्यालयास टाळे व उपोषण करण्यात येणार होते ते मागे घेण्यात आले असल्याचे सरपंच प्रतिभा एका वडे व उप सरपंच दिपाली पोकम यांनी सांगितले
राधानगरी पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीस सरपंच प्रतिभा एकावडे,उपसरपंच दीपाली पोकम पोलीस निरीक्षक संतोष गोरे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता एस बी इंगवले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि फेजीवडे गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थित होते
Comments
Post a Comment