Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरणाच्या संरक्षणार्थ केलेले कार्य ही श्रेष्ठ ईश्वरीय सेवा.... बीके ज्योती दिदी.

 पर्यावरणाच्या संरक्षणार्थ केलेले कार्य ही श्रेष्ठ ईश्वरीय सेवा.... बीके ज्योती दिदी.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीतसिंह ठाकूर

---------------------------------

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल आणि त्यामुळे दैनंदिन मनुष्य जीवनावर होणारे दुष्परिणाम हे अतिशय चिंताजनक असल्याचे समोर येत आहेत.देशातील अनेक भागात यावर्षी तापमान 50 डिग्री च्या जवळपास पोहचले.

 हे असेच तापमान वाढत राहले तर सर्व सजीव प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. भविष्यातील सांभाव्य धोका टाळण्यासाठी यावर आजच ठोस उपाययोजना करने आवश्यक आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी देशातील अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी व सुज्ञ नागरिक व शासकीय विभाग यथाशक्ती कार्य करित आहेत मात्र हे कामं एकट्यादोघांनी करण्याचे नाही तर देशातील प्रत्येकानी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय आपण पर्यावरण संरक्षण करू शकत नाही. प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय च्या वतीने सुद्धा 5 जून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करुन किमान तीन वर्ष त्यांचे संगोपन केले तरच आणि तरच वाढत्या तापमानाला कमी करणे शक्य आहे.

 सध्या पावसाळा सुरु झाला असून एक पाऊस पडल्यानंतर वृक्षरोपण केले तर ती वृक्ष जगतात.म्हणून जून जुलै या दोन महिन्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा मालकीच्या जागेत, शेतात, कार्यालय परिसरात प्रत्येकाने आपल्या परिवारात जेवढे सदस्य आहेत तेवढे वृक्ष लागवड करावी.कोणी पर्यावरण रक्षणासाठी कार्य करित असेल तर त्यांना विनाशर्थ सहकार्य करुन आपणही त्या उपक्रमाचा भाग व्हावं. स्वतः किंवा इतरांना सहकार्य करुन पर्यावरण संरक्षणार्थ केलेले कार्य ही श्रेष्ठ ईश्वरीय सेवाच आहे.ब्रह्माकुमारीज विद्यायाच्या संपर्कात असणाऱ्या सर्व भाऊ बहिणींनी ईश्वरीय कार्य समजून किमान एक झाड तरी लावण्याचा दृढ संकल्प करुन तो पूर्ण करावा असे आवाहन रिसोड ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments