एकाच वर्गातील १८ मित्रांच्या वाढदिवसाला उंदरवाडीच्या बेलजाई मंदिरात जमला मित्रांचा गोतावळा !
एकाच वर्गातील १८ मित्रांच्या वाढदिवसाला उंदरवाडीच्या बेलजाई मंदिरात जमला मित्रांचा गोतावळा !
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------
वर्षातील सर्वाधिक वाढदिवस असणारा दिवस म्हणजे एक जून. गुरुजींच्या कृपेने म्हणा किंवा शाळा सुरू होण्याचा महिना म्हणा .अनेकांचे वाढदिवस या महिन्यातील पहिल्याच तारखेला असतात. एकाच शाळेत एकाच वर्गामध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या गावातील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील एक जूनला वाढदिवस असणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा एकत्रित वाढदिवस करण्याचा निर्णय घेऊन तो प्रत्यक्षात अमलातही आणला. सरवडे (ता राधानगरी )येथील श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सरवडे या शाळेत १९९० ला दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या १४० विद्यार्थ्यांपैकी आज तब्बल १८ जणांचा वाढदिवस एकाच दिवशी होता. या सर्व विद्यार्थ्यांनी उंदरवाडी (ता कागल ) येथील बेलजाई मंदिरामध्ये एकत्र येऊन केक कापून व सर्वांना मिष्ठांन्न भोजन देऊन तब्बल सत्तर जणांनी एकत्र येत हा वाढदिवस साजरा केला.*
गुरुजींच्या कृपेने म्हणा किंवा जुन्या काळामध्ये मुलाला शाळा प्रवेश घेण्यासाठी शाळेत गेलेल्या वडिलांच्या कृपेने म्हणा जून महिन्यामध्ये पहिल्या तारखेला वाढदिवस असण्याची माहिती आपल्याला नवीन नाही. फेब्रूवारीत झालेल्या गेट टुगेदरला या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सर्वांच्या वाढदिवसाच्या तारखा घेतल्या होत्या. त्यात काही मित्रांच्या लक्षात आले की एक जूनला यातील सर्वाधिक वाढदिवस आहे. मग हे वाढदिवस आपण एकत्र येऊन का साजरा करू नयेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना एक सुखद धक्काही देता येईल आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येतील या एकमेव उद्देशाने सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होत हा वाढदिवस साजरा केला.*
*यावेळी नामदेव बुजरे ,एकनाथ पाटील ,तानाजी राणे ,विलास चव्हाण ,विश्वनाथ रानमाळे ,शिवाजी जरग ,कृष्णात फासके, जयवंत पाटील ,विष्णू पाटील, राजू सावंत, शिवाजी चौगले ,दत्तात्रय मोरे ,सौ. रत्ना सुतार,विलास मोरे,रामचंद्र काळूगडे,बाजीराव पाटील, बाबूराव मगदुम ,कृष्णात मोरे आणि गीता जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.*
*वर्गमित्र ह.भ.प. बाजीराव पाटील यांनी विधायक सेवेसाठी ग्रुप सज्ज ठेवा.वयाची पन्नाशी पार केलेले सर्वजण असल्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी आणि मित्र-मैत्रिणींची सुखदुःख जाणून घेण्यासाठी वेळ द्या,आयुष्यातील काही दिवस स्वतःसाठी ही जगा असा मौलिक सल्ला दिला.जगण्याचा अर्थ समजून घ्या.दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना .दुसऱ्यासाठी जगण्यात जो आनंद असतो तो स्वतासाठी जगण्यात मिळत नाही*
*यावेळी स्वागत प्रशांत भोसले यांनी केले.प्रास्ताविक विठ्ठल साबळे यांनी केले.तर बाजीराव पाटील, शाहू चौगले, कुसुम पाटील यानी मनोगत मांडले.या उपक्रमासाठी उंदरवाडी येथील सर्व मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले.*
Comments
Post a Comment