छत्रपती शाहू महाराजांची १५०वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरीत विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करणार राजे समरजितसिंह घाटगे.

 छत्रपती शाहू महाराजांची १५०वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरीत विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करणार राजे समरजितसिंह घाटगे.

-----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------


शाहूप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

   येत्या सव्वीस जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५०वी जयंती त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी राधानगरी येथे विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

ते पुढे म्हणाले, राधानगरी धरणस्थळी हा जयंती उत्सव साजरा करण्याचे हे पाचवे वर्ष आहे . राधानगरी धरणस्थळी हा उत्सव साजरा करण्या मागील हेतू हाच आहे की राजर्षी शाहू महाराजांचे नातू,शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंहजी घाटगे नेहमी म्हणत असत की राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना आजच्या समाजाने जयंतीपुरते पुतळा व प्रतिमापूजन यापुरते मर्यादित ठेवले आहे. मात्र त्यांचे कार्य इतके भव्यदिव्य आहे की ते संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारे आहे. हे कार्य जगासमोर आणता येईल अशा आदर्श पद्धतीने जयंती झाली पाहिजे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे राधानगरीला मुक्तहस्ते निसर्गसौंदर्याची उधळण केली आहे.शहरातील पर्यटकांना नेहमीच याची भुरळ पडते. या निमित्ताने पर्यटक यावेत व स्थानिक नागरिकांनी याचा फायदा व्हावा.हा उद्देश आहे.


 जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्याची संकल्पना माझी नाही.तर राधानगरी परिसराच्या वाडीतील एका धनगराने मला ती सुचवली.जन्मोत्सव समितीने मला व पत्नी नवोदिता घाटगे यांना उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली.त्यानुसार आम्ही या ठिकाणी सलग पाचव्या वर्षी या जयंती सोहळ्यास येतआहोत. त्यामुळे बहुजन समाजाचा हा जन्मोत्सव सोहळा राजर्षी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील अशा भव्य दिव्य पद्धतीने करण्याचा मानस आहे.शाहूप्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहनही त्यांनी केले.

या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देताना संभाजी आरडे म्हणाले

   सकाळी दहा वाजता धरणातील पाण्याचे कलश जलाभिषेकसाठी राजे समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांच्यासह बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीतील जोडपी आणतील.सकाळी अकरा वाजता शाहूंच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक,पुतळा पूजन व अभिवादन कार्यक्रम होईल. कार्यक्रम स्थळी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक व शाहीर गाण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. 


या पत्रकार परिषदेस दत्तात्रेय मेडशिंगे रविष कौलवकर विलास रणदिवे सचिन मगदूम धैर्यशिल इंगळे रणजित पाटील आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.