स्वामी विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा.

 स्वामी विवेकानंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा.

------------------------------------ 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड/ प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर 

------------------------------------ 

तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड येथे 21जून शुक्रवार सकाळी 7:30 वाजता आंतरराष्ट्रीय योगा दिवस विविध योगासने व योगा प्राणायाम करुन साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव यांनी योगाचार्य म्हणून विविध योगासने उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाह ग्रामपंचायत सचिव व कर्मचारी यांना योगाचे मार्गदर्शन केले.उपस्थित सर्वांनी अतिशय आनंददायी पद्धतीने योगासने केली. योगादिनानिमित्त शिक्षक ज्ञानेश्वर मांडे यांनी योगादिनाचे  महत्व सांगून नियमित योगा केल्याचे फायदे सांगितले. योगा दिनाला मुख्याध्यापक शिवाजीराव जाधव,ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत व्याड जी यु देशमुख, ग्रामपंचायत सदस्य देवानंद वाकोडे, ऑपरेटर रवि पवार, ग्रामपंचायत कर्मचारी विजय दाहिरे, शिक्षक रवि अंभोरे, ज्ञानेश्वर मांडे, गजानन घाटोळ,रामेश्वर पवार,गणेश हेंबाडे,प्रा. प्रवीण सरनाईक,लिपिक वैभव राजे सह रमेश पडघान, नरेश बचाटे, भारत माकोडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. रमेश पडघान यांनी योगाचे महत्व विषद करणारे गीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.