Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवरायांच्या विचाराचे आचरण होणे गरजेचे - सरपंच संदीप ढेरंगे.

 शिवरायांच्या विचाराचे आचरण होणे गरजेचे - सरपंच संदीप ढेरंगे.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 वाघोली प्रतिनिधी 

----------------------------------

( पुणे ) वाघोली : ''छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रेरणा संपूर्ण जगाला दिली. त्यांचे विचार सर्वांना मार्गदर्शक आहेत. अशा विचारांचे आचरण तरुणांनी करणे गरजेचे आहे.'' असे प्रतिपादन कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी केले. कोरेगाव भिमा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिव्यांगाच्या हस्ते स्वराज्य गुढी उभारून शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला.


यावेळी कोरेगाव भिमाचे नवनिर्वाचित सरपंच संदीप ढेरंगे,मा.सरपंच विजय गव्हाणे,सदस्य शरद ढेरंगे,ग्रामविकास अधिकारी रतन दवणे,दीपक गव्हाणे, गावातील कुंडलिक वायकुळे, दशरथ गव्हाणे, माणिक सोनवणे, राजू जाधव, सोमनाथ परदेशी, गोरक्ष जाधव, रेश्मा कडलग, परशुराम घावटे ,वंदना शिरतोडे, पंडित वारे, अशोक ढेरंगे, विराज काशीद, अलका ढेरंगे, आरिफ जमादार, आनंदा पवार आदी उपस्थित होते.


यावेळी कुंडलिक वायकुळे बोलताना म्हणाले गावामध्ये अपंगांना योग्य न्याय देत अपंग कल्याण निधीची रक्कम वेळेवर मिळावी. तर माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी नागरिकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कुंडलिक वायकुळे यांच्या आवाहनानंतर सरपंच संदीप ढेरंगे यांनी अपंग निधी योग्य वेळेत वितरित करण्याची ग्वाही दिली

Post a Comment

0 Comments