परप्रांतीय एकास मारहाण करून पळून जाणाऱ्या पाच जणांना सातारा पोलिसांनी घेतल ताब्यात.

 परप्रांतीय एकास मारहाण करून पळून जाणाऱ्या पाच जणांना सातारा पोलिसांनी घेतल ताब्यात.



-------------------------‐----------‐---

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

 अमर इंदलकर.

---‐-----------------------------------

सदरबाझार सातारा येथील हॉटेलचे कामावरून घरी जात असणारे परप्रांतिय युवकास मारहाण करून त्याचा मोबाईल चोरी करून पळ काढणाऱ्या पाच जणांना सातारा शहर डी. बी पथकाने घेतले ताब्यात. आरोपींकडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व एकूण ४ मोबाईल असा एकूण १,८०,००० रुपयेचा मुद्देमाल जप्त.


        दि. १६/०६/२०२४ रोजी रात्रीचे वेळी सातारा शहर पोलीस ठाणे हददीतील सदरबझार येथील ग्रीन फिल्ड हॉटेल मधील परप्रांतिय कामगार हे हॉटेलचे काम झालेनंतर पायी रहाते घरी जात असताना सदरबझार येथील सुमित्राराजे गार्डनजवळ काही टवाळखोरी करणारे युवकांनी सदर परप्रांतिय युवकांना रस्त्यामध्ये आडवून त्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल मागितली. त्यावर परप्रांतिय युवकाने त्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल दिली. पाणी पिल्यानंतर उर्वरित पाण्याची बॉटल त्याने मागितले असता सदर युवकांनी त्यांना आम्ही येथील राहणारे असून आम्हाला परत बॉटल मागतोय का वगैरे बोलून त्यांच्याशी हुल्लडबाजी करत भाईगिरीची भाषा करून चापट मारून लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्यातील एकाने परप्रांतिय युवकाचे डोक्यात दगडाने मारहाण करून त्यास जखमी केले. तसेच त्याचेकडील मोबाईल हिसकावून हुल्लडबाजी करत मोटारसायकलवरून पळून गेले होते. त्यानंतर जखमी युवकाने हॉस्पिटलमध्ये जावून उपचार घेतले. सदर प्रकाराने सदरचे परप्रांतिय युवक भयभित झाले होते. सदर मारहाण करणारे युवकांना मा पोलीस अधिक्षक समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले सातारा शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी. बी. पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा कसोशीने शोध घेवून आरोपी नामे १) सौद अहमद खान वय २१ वर्षे, रा. शाहुनगर जगतापवाडी गोडोली सातारा. २) संकेत हिरालाल कदम वय १९ वर्षे, रा. पाटील प्लाझा अपार्टमेंन्ट तळमजला सदरबझार सातारा. ३) लक्ष दिपक कदम वय १९ वर्षे रा.४४० म्हाडा कॉलनी सदरबझार सैनिकस्कूलचे पाठीमागे सातारा. ४) आदित्य नारायण कांबळे वय १९ वर्षे, रा. ४४८ गोकुळ अपार्टमेन्ट तिसरा मजला सदरबझार सातारा. ५) अभिजित श्रीधर सुर्यवंशी वय १९ वर्षे, रा. गोळीबार मैदान सातारा मुळ रा. मिल्ट्री अपशिंगे ता. जि. सातारा सदर आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी चोरी केलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली विनानंबर प्लेटची मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे.

     आवाहन सातारा शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांनी सातारा शहरातील जनतेस आवाहन केले आहे की, सातारा शहरामध्ये कोणी मुले एकत्र बसून टवाळखोरी करत, हुल्लडबाजी करत असतील अशा ठिकाणच्या राहणारे नागरिकांनी याची माहिती सातारा शहर पोलीस ठाणेस दयावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सदर युवकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

   सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, अविनाश गवळी (पोलीस उपनिरीक्षक ) पो. हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते, विक्रम माने, पो. कों, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.