विशाळगड व हडपसर येथील विटंबना प्रकरणातील आरोपीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगुड येथे निदर्शने.

 विशाळगड व हडपसर येथील विटंबना प्रकरणातील आरोपीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगुड येथे निदर्शने.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड/ प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार

--------------------------------

विशाळगड मुक्ती आंदोलन संदर्भात आणि हडपसर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मुरगुड येथील शिवतीर्थ येथे निदर्शने करण्यात आले . विशाळगडावरील 1886 च्या बॉम्बे गॅझेट नुसार गडावरील दर्गा ठेवून वाढलेले इतर अतिक्रमण निघावं ,गडावरील इतर अतिक्रमण व ऐतिहासिक विहिरीवर असणार अतिक्रमण तात्काळ हटवावं ,वनविभाग च्या हद्दीतील पार्किंग च अतिक्रमण हटवून तेथील जागा रिकामी करावी , गडदेवता वाघजाई देवी मंदिराच ऐतिहासिक स्वरूपाचं बांधकाम होण्यासाठी भरीव निधी मिळावा , छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अंबिका राणीसाहेब यांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा , गडावर लागू करण्यात आलेली पशु पक्षी हत्या बंदी कायमस्वरूपी ठेवून तिच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात यावेत तसेच हडपसर येथील भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांना देण्यात आले. 

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विशाळगड किल्ला सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला गडावरती दारू पार्टी ,पशू पक्षी हत्या , कचरा यांच्यामुळे गडाचे पावित्र्य कमी होत आहे त्यामुळे गडावरील नंतरच्या काळात झालेली सर्व अतिक्रमणे काढली पाहिजेत तसेच गडावर कायमस्वरूपी पशुपक्षीहत्या बंदी झाली पाहिजे तसेच हडपसर येथे दिवसाढवळ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली जर राजरोसपणे असे प्रकार घडत असतील तर या प्रकारांना पाठीशी कोण घालत आहेत याची माहिती घेतली पाहिजे तसेच असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे असे प्रकार पुन्हा घडल्यास शिवप्रेमी शांत बसणार यावेळी सर्जेराव भाट, जगदीश गुरव,,ओंकार पोतदार, तानाजी भराडे, संकेत शहा, रणजीत मोरबाळे, शिवाजी चौगुले, आनंदा रामाने, सुरज मोरबाळे, शिवाजी रावण, ,अजित गुरव , महादेव वागणेकर, प्रकाश परिषवड यांच्यासह शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.