सतत विद्युत बिघाड,ट्रान्सफॉर्मर पुरवठा दिरंगाई व विद्युत समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा- ॲड.नकुल देशमुख.

 सतत विद्युत बिघाड,ट्रान्सफॉर्मर पुरवठा दिरंगाई व विद्युत समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा- ॲड.नकुल देशमुख.

------------------------------------

रिसोड.प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर

------------------------------------

  ॲड.देशमुख यांची महावितरण कार्यालयास भेट,विद्युत समस्या सोडवण्याच्या सूचना.

भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांनी रिसोड येथे महावितरण कार्यालयास भेट देऊन विजय सातत्याने होणारे बिघाड, विजेचा लपंडाव आणि ट्रांसफार्मर तात्काळ देण्यात यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

रिसोड तालुक्यात व शहरांमध्ये मागील बऱ्याच दिवसापासून विज लपंडा सातत्याने होणारे बिघाड आणि जळालेले रोहित्र तात्काळ न मिळणे ह्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या तालुका व शहरातील नागरिकांनी या संदर्भात भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्याकडे या समस्यांची मांडणी केली व या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली. सातत्याने होणाऱ्या मागणीमुळे ॲड. देशमुख यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातून असणाऱ्या समस्यांच्या तक्रारी करणाऱ्या नागरिकांना व शहरातील विद्युत समस्या संबंधी नागरिकांना घेऊन रिसोड येथील महावितरण कार्यालयास भेट दिली तसेच काही समस्यांचे तात्काळ निवारण महावितरणच्या अधिकाऱ्यांसमक्ष केले तसेच यावेळी देशमुख यांनी रिसोड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात होणारे विद्युत बिघाड आणि विजेचा लपंडाव ही सामान्य नागरिकांमध्ये रोष आणणारी समस्या असून यामुळे रिसोड शहर व तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे अशा गोष्टी उद्भवू नये यासाठी महावितरणने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्या सोबतच अशा समस्या निर्माण झाल्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या सोडवण्यासाठी तत्परतेने संबंधित गावात संबंधित ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याचे सूचनाही भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांसमक्ष दिल्या. तसेच बऱ्याच गावांमध्ये ट्रांसफार्मर बिघाड होतो तो बदलून देण्यात दोन ते तीन तो बदलून देण्यात जास्त कालावधी लागू देऊ नये कारण जास्त कालावधी लागल्यास संबंधित गावातील व शहरातील नागरिकांना विज उपलब्ध होत नाही ही मोठी समस्या आहे त्यामुळे यानंतर ट्रांसफार्मर बिघाड झाल्यानंतर तो लवकरात लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या अशी सूचना सुद्धा देशमुख यांनी केली. प्रसंगी रिसोड तालुका व शहरातील नागरिकांच्या विजेच्या संबंधित समस्या सोडवण्यासंदर्भात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांना भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांनी सांगितले.भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, रिसोड नगराध्यक्ष सौ. विजयमाला कृष्णाजी आसनकर,माजी नगराध्यक्ष यशवंतराव देशमुख,जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे,ओंकार सुरकुटे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव खरात, ॲड.कृष्णा आसनकर,प्रतिष्ठित व्यापारी नंदू भाऊ झंवर,रिसोड शहर अध्यक्ष नंदकिशोर मगर,जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरराव तहकिक,युवा मोर्चा प्रदेश सदस्य सारंग निर्बान,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमोल पाटील भुतेकर, पुरूषोत्तम तहकिक,युवा मोर्चा, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री ॲड.माधुरीताई देशमुख, रिसोड शहराध्यक्ष प्रणिता ताई महाजन,सचिव वर्षाताई इरतकर, शैलाताई देशमुख,शहरचिटणीस पूजाताई खंदारे,शहराध्यक्ष सागर भाऊ डांगे,ओबीसी शहराध्यक्ष शिवराज जहीरव, किसान मोर्चा शहराध्यक्ष कैलास फटांगळे, सदाभाऊ चौधरी,भाजप अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष संदीप धांडे,रिसोड भाजपा तालुका सरचिटणीस भूषण दांदडे, पंचायत समिती सदस्य रवी आढाव, भाजप शहर सरचिटणीस धनंजय मानवतकर,पंचायत राज तालुकाध्यक्ष ॲड.गजाननराव देशमुख,महिपती इंगळे, वसंतराव देशमुख, गोपाल झनक,गोपाल विखे,विकास इरतकर,नटू लाला,पप्पू देशमुख, अमोल देशमुख, प्रवीण देशमुख, गणेश भांदुर्गे, संतोष वाबळे, शुभम लोखंडे,आदित्य भांदुर्गे, सहित रिसोड शहर व तालुक्यातील शेतकरी नागरिक विद्युत संबंधित समस्या व तक्रारी घेऊन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.