Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा युनियन मार्फत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा युनियन मार्फत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

----------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

 राजू कदम

----------------------------------

सांगली. आज महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा युनियन मार्फत अर्थ युनियन योग्यता प्रमाणपत्र पासिंग साठीचे विलंब शुल्क प्रतिदिन पन्नास रुपये रद्द करण्याच्या मागणीसाठी तसेच रिक्षा संघटनेच्या अन्य मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या ठिकाणी विविध रिक्षा संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले 

सदर आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस सर चंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष संजय जी बजाज साहेबांनी पक्षांच्या वतीने उपस्थित राहून जाहीर पाठिंबा देत रिक्षा संघटनेच्या मागण्या ह्या आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त खासदारांच्या वतीने संसदेत मान्यता प्रयत्न केला जाईल असा विश्वास रिक्षा संघटनेला दिला सध्या रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती पहात शासनाने तात्काळ विलंब शुल्क रद्द करावा अन्यथा आंदोलन तीव्र करावे लागेल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले तसेच रिक्षा संघटनेच्या सर्व समस्या ह्या पक्षमार्फत शासन दरबारी मांडण्यात येतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्ष हा नेहमीच रिक्षा संघटनेच्या प्रत्येक अडचणी प्रसंगी उभा राहिलेला आहे आणि इथून पुढे देखील लागेल ती सर्वोत्तपरी मदत रिक्षा संघटना करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी सहज जिल्हा अध्यक्ष संजय जी बजाज साहेब राष्ट्रवादीच्या चंद्र पवार पक्षाचे सांगली अध्यक्ष महालिंग हेगडे पक्षाचे खजिनदार निलेश शहा शहर जिल्हा उपाध्यक्ष शितल खाडे तसेच राष्ट्रवादी रिक्षा संघटनेच्या शहर जिल्हाध्यक्ष फिरोज मुल्ला ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष बालम मुजावर त्याचबरोबर सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे महादेव पवार सांगली जिल्हा प्रवासी वाहतोय रिक्षा संघटनेचे महेश चौगुले विद्यार्थी वाहतूक रिक्षा पंचायत चे राजू रसावळ रिक्षा चालक-मालक संघटनेचे मनसुर नदाफ करवीर रिक्षा युनियन चे प्रकाश चव्हाण आदी उपस्थित रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी यासह मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments