जनता शिक्षण संस्थेची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

 जनता शिक्षण संस्थेची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम.

----------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

 वाई प्रतिनिधी 

 कमलेश ढेकाणे 

----------------------------------

वाई: ०६ जनता शिक्षण संस्था, वाई च्या इ. १० वी व इ. १२ वीच्या सर्वच शाखांनी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ठ निकालाची परंपरा राखली आहे. शाखानिहाय १२ वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखा ९६.०० टक्के, वाणिज्य शाखा ८९.३६ टक्के, कला शाखा ६६.४७ टक्के 

कनिष्ठ महाविद्यालयातील शाखानिहाय प्रथम आलेले विद्यार्थी व त्यांची टक्केवारी पुढीलप्रमाणे: विज्ञान शाखा – श्री. हर्षद गणेश अडसुळ– ८४.६७ टक्के, कु. तनुजा अजय निकम ८४.६७ टक्के, वाणिज्य शाखा कु. श्रुती विकास पवार ८८.६७ टक्के, कला शाखा- कु.अक्षदा संदिप यादव - ८५.३३ टक्के

तसेच इ. १० वी बोर्ड परीक्षा शाळानिहाय निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे: अरविंद पवार (पाटील) माध्यमिक विद्यालय, वेळे १०० टक्के,  माध्यमिक विद्यालय, खानापूर १०० टक्के, माध्यमिक विद्यालय, शिरगांव १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, व्याजवाडी १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल, धावडी १०० टक्के, लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालय, शेंदुरजणे ९५.८३ टक्के, माध्यमिक विद्यालय, गोवेदिगर १०० टक्के. लागला आहे. 

तसेच शाळानिहाय प्रथम आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे: 

अरविंद पवार (पाटील) माध्यमिक विद्यालय, वेळे ची कु. श्रुती सत्यवान पवार, वेळे ८९.८० टक्के,

माध्यमिक विद्यालय, खानापूर ची कु. सुजल जितेंद्र जाधव, खानापूर  ८७.८० टक्के, 

माध्यमिक विद्यालय, शिरगांव चा श्री. गणेश मधुकर भोसले, शिरगांव  ८२.८० टक्के,

न्यू इंग्लिश स्कूल, व्याजवाडी चा श्री. विश्वजित प्रकाश मालुसरे, व्याजवाडी  ८७.८० टक्के,

न्यू इंग्लिश स्कूल, धावडी ची कु. हर्षदा संतोश चौधरी, धावडी ८४.८० टक्के,

लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालय, शेंदुरजणे ची कु. सानिका संतोष जगताप, ८३.६० टक्के, 

माध्यमिक विद्यालय, गोवेदिगर चा श्री.अर्थव संतोष शिंदे ८२.८० टक्के.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री. शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार प्रा.नारायण चौधरी, प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. विवेक सुपेकर, पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रमे श्री.संजय वाईकर, श्री. शंकरराव यादव, सौ. सुषमा शिंदे, श्री. मिलिंद कदम, श्री. सुनिल शेलार, श्री.संजय कुंभार, श्री. निखिल भोसले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

चौकट – किसन वीर महाविद्यालयात इ. ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान आणि बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी, मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहितीपत्रक वाटप सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.