Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भर दिवसा फेजिवडे गावात दीड लाखाची चोरी.

 भर दिवसा फेजिवडे गावात दीड लाखाची चोरी.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

--------------------------------------

राधानगरी तालुक्यातील फेजिवडे येथे भर दिवसा अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दीड लाखा चे सोने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली


अधिक माहिती अशी की फेजीवडे येथील नवीन वसाहती मध्ये राहणारे वाशिम आबास शेख वय36 हे नोकरीस असल्याने ते शुक्रवारी सकाळी आठ वाजता नोकरीस गेले होते ते सायंकाळी साडेचार वाजता नोकरीवरून घरी आले असताना त्यांना घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटा च्या बॉक्समध्ये ठेवलेले पंधरा ग्राम सोन्याचा नेकलेस अंदाजे 75000 व 15 ग्राम सोन्याची गंठण 75 हजार रुपये असे दोन्ही वस्तूची किंमत मिळून दीड लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरी करून पळून गेला असल्याची फिर्याद वासिम शेख यांनी राधानगरी पोलीस स्टेशन दिल्यावर अज्ञात चोरट्यावर राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाखाली शिंदे हेड कॉन्स्टेबल यादव हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments