सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न.
-------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-------------------------------
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून योग गुरु जयराम पाटील हे उपस्थित होते त्यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखवत योग आसनांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजीराव होडगे यांनी भूषविले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संयोजक, जिमखाना विभाग प्रमुख, प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी केले. तर आभार प्राध्यापक पांडुरंग फराकटे यांनी मानले. यावेळी निवृत्त होऊ घातलेले जिमखाना विभागाचे शिपाई दिलीप कांबळे यांचाही यथोचित सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद प्रशासकीय सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी व इतर उपस्थित होते
Comments
Post a Comment