Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकाराला मारहाण करणाऱ्या राजेखान जमादारची हकालपट्टी करा.

 पत्रकाराला मारहाण करणाऱ्या राजेखान जमादारची हकालपट्टी करा.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी  प्रतिनिधी

 विजय बकरे 

------------------------- 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाची राजेश क्षीरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

राजेखान जमादार याच्या हकालपट्टीचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात                                                                                                                                                 


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान दैनिक सकाळ चे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख राजेखान जमादार याची शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते या अर्थाने जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करून पत्रकारांना न्याय मिळावा, अश्या प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.अश्या प्रकारचे कृत्य करणाऱ्या पुढाऱ्याची हकालपट्टी करून शिवसेना शिंदे गट पत्रकारांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाला न्याय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांची मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

या शिष्टमंडळात पत्रकार संघाचे जिल्हा सचिव नवाब शेख, जिल्हा संघटक विनोद नाझरे, , शहर संघटक सागर शेरखाने, करवीर तालुकाध्यक्ष जावेद मुजावर, शहर उपाध्यक्ष फरीद शेख,विजय बकरे,सुशांत पोवार यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments