Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू राज्यांच्या जयंती निमित्त राधानगरीत रक्तदान शिबीर संपन्न.

 राजर्षी शाहू राज्यांच्या जयंती निमित्त राधानगरीत रक्तदान शिबीर संपन्न.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल 150 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

    राधानगरी पोलीस ठाणे व राजर्षी शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राधानगरी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  

    अंबाबाई मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरासाठी तालुक्यातील पत्रकार, पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना, कोतवाल संघटना, शासकीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, मोहिते पावर हाऊसचे कर्मचारी, विद्यार्थी, कॉलेज युवक युवती यांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कोल्हापूर येथील वैभव लक्ष्मी ब्लड बँक या रक्तपेढीने सर्व रक्त संकलित केले. सर्व रक्तदात्यांना यावेळी मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. 

    रक्तदान हेच जीवनदान आहे रक्तदानाप्रती जागृती वाढवणे जरुरीच आहे असेच गरजूंना वेळेवर सुरक्षित हा योग्य रक्त मिळावे यासाठी सर्वांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या रक्ताचा पुरवठा अत्यंत अल्प प्रमाणात आहे मात्र रक्ताची मागणी मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात त्यामुळे रक्तदान शिबीरामध्ये तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

      छत्रपती शाहू महाराज यांनी जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. विशेषता राधानगरी व परिसरातील लोकांसाठी राधानगरी धरण बांधून त्यांनी आपला मोठा खजिना त्यासाठी खुला केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व विकसित झालेला आहे. त्यामुळे त्यांना १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दहा मिनिटे वेळ काढून रक्तदान करून छत्रपती शाहू महाराजांची आठवण जपूया. असे आवाहन राधानगरी पोलीस अधिकारी व राजर्षी शाहू महाराज राधानगरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. विशेष म्हणजे राजर्षी शाहूंची 150 वी जयंती आणि 150 रक्तदात्यांनी रक्तदान केले ही खास बाब होती. 

      रक्तदान शिबिरास राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांचे सर्व कर्मचारी, पत्रकार महेश तिरवडे, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पाटील, अरविंद पाटील, सचिव शशिकांत बैलकर, अविनाश तराळ, गौरव सांगावकर,, मिलिंद कांबळे, उत्तम पाटील, पांडुरंग पोवार, पी जी कांबळे, गजानन संकपाळ,अशोक पाटील आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक महेश तिरवडे यांनी केले. आभार अनिल पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments