रिसोड पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा.
रिसोड पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------------
हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
काल दिनांक एक जुलै रोजी येथील पंचायत समितीमध्ये कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शासन स्तरावरून कृषी दिन साजरा केला जातो येथील पंचायत समितीमध्ये वृक्षारोपण तसेच उपस्थित शेतकऱ्याचा सन्मान करून कृषी दिन साजरा करण्यात आला तदनंतर शेती आणि मातीवर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषी तज्ञ व प्रगती शेतकरी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी वृक्षारोपण व उपस्थित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, तालुका कृषी अधिकारी मदन तावरे, रिसोड पंचायत समिती सभापती बंडू भाऊ हाडे,मंडळ कृषी अधिकारी उलेमाले, धनेकर कृषी पर्यवेक्षक व पंचायत समिती विस्तार अधिकारी आशिष मुळे, विस्तार अधिकारी कृषी स्वप्निल बनसोड, पंचायत समिती सदस्य वानखेडे, धांडे, बोंडे, तेजराव वानखेडे,, बाजड, यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचायत समिती आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष लागवड व वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला.
Comments
Post a Comment